• Download App
    आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, लाभ पवार सरकार घेते, शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल|We want to say that Thackeray government, Pawar government takes advantage, Shiv Sena leader attacks NCP

    आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, लाभ पवार सरकार घेते, शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी: महाविकास आघाडीत अंतर्गत भेद खूप आहेत आणि त्याचा त्रास होतो. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते, अशा शब्दात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.We want to say that Thackeray government, Pawar government takes advantage, Shiv Sena leader attacks NCP

    कोकणातील दापोलीमध्ये बोलताना कीर्तीकर म्हणाले की, विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. आम्हाला मात्र मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईमध्ये नागरोत्थान आणि नगरविकास विभागाचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो ही. मात्र, निधीची पळवापळवी केली जात आह. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते.



    महाविकास आघाडीतील अंतर्गत भेदांवर कीर्तीकर म्हणाले, आघाडीत अंतर्गत भेद खूप आहेत आणि त्याचा त्रास होतो असे कीर्तीकर म्हणाले. हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही. मात्र, इकडे अधिक आहे. हा त्रास आमदार योगेश कदम यांना भोगायला लागत असल्याचे सांगत मी आपल्या पाठीशी आहोत असे आमदार योगेश कदम यांना सांगितले.

    निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेला अतिशय कमी निधी मिळाल्याचे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निधी वाटपावरून शिवसेनेला चिमटा काढला होता. त्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळत फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी फडणवीस यांच्या बोलण्याला पाठिंबा दिला आहे.

    We want to say that Thackeray government, Pawar government takes advantage, Shiv Sena leader attacks NCP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक