वृत्तसंस्था
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करता येणार नाही. मात्र, घराजवळ त्यांचं लसीकरण करणे शक्य आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी दिली. We Definitely give vaccinated near home; Centre’s explanation in Mumbai High Court
केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 28 मेपर्यंत झालेल्या लसीकरणातून 25 हजार 309 नागरिकांना साईड इफेक्ट जाणवले आहेत. त्यात 1183 प्रकरण गंभीर आहेत. 475 नागरिकांनी प्राण गमवल्याची माहिती सरकारने दिली. भारतात सुमारे 25 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मोठी लोकसंख्या असूनही सक्षमरित्या लसीकरण मोहिम राबवित आहोत, असे स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बाहेर जाणे शक्य नसल्यामुळे त्यांना घरोघरी जाऊन लस द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील वकील ध्रुती कापाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.
तूर्तास घरोघरी जाऊन लसीकरणाचं धोरण अवलंबणं हे व्यवहार्य होणार नाही. असं केंद्र सरकारच्यावतीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन (एनईजीव्हीएसी) नं म्हटलं आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना घरोघरी न जाता घराजवळ लसीकरण मोहिम राबविणे जास्त संयुक्तिक ठरेल असे स्पष्ट केले आहे. तसेच वयोवृद्ध, दिव्यांगांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा असल्यामुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना, दक्षता आणि सुरक्षिततेची सोय करूनच त्यांच्याजवळ लसीकरण केंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचेही एनईजीव्हीएसीने म्हटलं आहे.
We Definitely give vaccinated near home; Centre’s explanation in Mumbai High Court
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग होतो ; कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही : डॉ. रणदीप गुलेरिया
- हैदराबादमध्ये गरिबांना भेटला देवदूत, डॉ. व्हिक्टर करतात दहा रुपयात कोरोना रुग्णांवर उपचार
- सुवेंदू अधिकारी यांनी घेतली अमित शहांची भेट, तृणमुल कॉंग्रेसचे टीकास्त्र
- उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांत कोरोना संसर्ग घटला, संचारबंदी शिथील
- निवडणुकीतील पराभवामुळे केरळच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना डच्चू
- विज्ञानाची गुपिते : जगात चित्ताच का सर्वांधिक वेगाने धावतो
- कोरोनावर ‘डीएनए’ आधारित लस प्रभावी, तैवानच्या शास्त्रज्ञांचा दावा
- केरळच्या मुख्यमंत्र्यांचा एक महाल बने न्यारा, शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी करणार एक कोटी रुपये खर्च