• Download App
    पुण्यात गुरुवारी पाणीबाणी; काही भागांतील पाणीपुरवठा २७ जानेवारीला बंद राहणार। Water supply in some areas will be cut off on January 27 in pune

    पुण्यात गुरुवारी पाणीबाणी; काही भागांतील पाणीपुरवठा २७ जानेवारीला बंद राहणार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याच्या काही भागांतील पाणीपुरवठा येत्या २७ जानेवारी रोजीबंद राहणार असून २८ जानेवारी रोजी कमी दाबानं पुरवठा होणार आहे. Water supply in some areas will be cut off on January 27 in pune

    वारजे जलकेंद्र, खडकवासला उपसा (रॉ वॉटर) केंद्र तसेच रायझिंग मेन लाइनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी काम करावयाचे असल्यामुळे २७ जानेवारी (गुरुवार) कोथरूड, डेक्कन, बाणेर-बालेवाडी तसेच विमाननगर व लोहगाव परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर २८ जानेवारी (शुक्रवार) रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

    २७ जानेवारी रोजी वारजे जलकेंद्र येथील पंपिंग कामामुळे बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र तसेच नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.



    पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

    भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भूगाव परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वे रस्ता , एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानी नगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता

    नवीन होळकर जलकेंद्राकडील परिसर: कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव, पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोले रस्ता, सेनापती बापट रस्ता, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलिस लाइन, मुळा रोड, संगमवाडी, पाटील इस्टेट, भांडारकर रस्ता.

    Water supply in some areas will be cut off on January 27 in pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस