• Download App
    WATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग । Watch Railwayman Vangani Staition risked his own life & saved a child captured in CCTV

    WATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग

    Railwayman Vangani Staition : समोरून भरधाव रेल्वे येतेय आणि तितक्यात महिला प्रवाशाजवळचं बाळ रेल्वे रुळावर पडलं. रेल्वे अवघ्या काही सेकंदांत जवळ येणार तितक्यात देवदूत बनून रेल्वे कर्मचाऱ्याने धाव घेतली आणि आपल्या जिवाची पर्वा न करता त्या बाळाला प्लॅटफॉर्मवर ढकलले. ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना वांगणी रेल्वे स्थानकात घडली आहे. मयूर शेळके असं त्या बहादूर रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. Watch Railwayman Vangani Staition risked his own life & saved a child captured in CCTV


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : समोरून भरधाव रेल्वे येतेय आणि तितक्यात महिला प्रवाशाजवळचं बाळ रेल्वे रुळावर पडलं. रेल्वे अवघ्या काही सेकंदांत जवळ येणार तितक्यात देवदूत बनून रेल्वे कर्मचाऱ्याने धाव घेतली आणि आपल्या जिवाची पर्वा न करता त्या बाळाला प्लॅटफॉर्मवर ढकलले. ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना वांगणी रेल्वे स्थानकात घडली आहे. मयूर शेळके असं त्या बहादूर रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

    ही थरारक घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. पॉइंटमन असलेल्या मयूर शेळके यांनी धाव घेतली नसती तर मोठा अनर्थ ओढवला असता. मयूर शेळकेंच्या सजगतेमुळेच चिमुकल्याचा जीव वाचला आहे.

    वांगणी स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर एक अंध महिला लहान मुलासह चालत होती. यावेळी हा मुलगा तोल जाऊन रेल्वे रूळावर पडला. रेल्वे तेथे येण्यास फक्त काही सेकंदांचा अवधी होता. आपले बाळ रुळावर पडल्याचे कळताच ती महिला प्रवासी आरडाओरड करू लागली. ही घटना पॉइंटमन मयूर शेळके यांना दिसताच त्यांनी क्षणार्धात तेथे धाव घेऊन बाळाला उचलून प्लॅटफॉर्मवर लोटले आणि स्वत:ही वर आले. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. शनिवारी (दि. 17) वांगणी स्थानकावर या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    पॉइंटमन मयूर शेळके यांच्या या धाडसाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही कौतुक केले आहे. पीयूष गोयल यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, वांगणी स्थानकावरील रेल्वेमन मयूर शेळके यांचा अभिमान वाटतो. त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवले.

    मयूर शेळके याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामगिरीसाठी सोशल मीडियावरील युजर्सही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

    Watch Railwayman Vangani Staition risked his own life & saved a child captured in CCTV

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य