• Download App
    आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय? मग या वेबसाइट जरूर पाहा । List Of Important Websites To Track Bed Oxygen remedesivir and plasma, Check Yourself

    Important Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय? मग या वेबसाइट जरूर पाहा

    Important Websites To Track Bed Oxygen remedesivir : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या चोवीस तासांत पावणे तीन लाखांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. आगामी काळात कोरोना संसर्गाचे प्रमाण आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राज्यांत हॉस्पिटलमध्ये बेड मिळणेही अवघड झाले आहे. List Of Important Websites To Track Bed Oxygen remedesivir and plasma, Check Yourself 


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या चोवीस तासांत पावणे तीन लाखांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. आगामी काळात कोरोना संसर्गाचे प्रमाण आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राज्यांत हॉस्पिटलमध्ये बेड मिळणेही अवघड झाले आहे.

    देशाची एकीकडे कोरोनाशी लढाई सुरू असतानाच दुसरीकडे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यालाही तोंड द्यावे लागत आहे. गंभीर रुग्णांच्या अडचणीत यामुळेच वाढ झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्यांशी समन्वय करून आवश्यक पावले उचलली आहेत. रेमडेसिव्हीरच्या निर्यातीवर निर्बंध लादून देशात उत्पादन वाढण्याचे निर्देश औषध निर्मात्या कंपन्यांना दिले आहेत. ऑक्सिजन पुरवठ्यासाठीही अशीच तातडीची पावले उचलण्यात आली आहेत.

    यादरम्यान बेड आणि ऑक्सिजनच्या चौकशीसाठी लोकं आता सोशल मीडियाचा आधार घेताना दिसत आहेत. अनेक सोशल पेजेसनी यासाठी लोकांना मदत देऊ केली आहे. बेड, इंजेक्शन आणि प्लाझ्मा डोनरच्या अपडेटसाठी येथून लोकांना अद्ययावत माहिती मिळत आहे.

    जर तुमच्या जवळच्या व्यक्तीला बेड, रेमडेसिव्हिर किंवा ऑक्सिजनची गरज असेल तर या काही लिंक्स तुमच्या नक्कीच कामी येऊ शकतात.

    • दिल्ली सरकारने यासाठी अधिकृत वेबसाइट लाँच केली आहे. https://delhifightscorona.in/
    • हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, प्लाझा यांच्या माहितीसाठी https://blog.indianhelpline.com/2021/04/15/india-fights-covid/ य वेबसाइटवरही जाऊ शकता.
    • बंगळुरूत असाल तर https://covidhelplinebangalore.com/ ही वेबसाइट तुमच्या कामाची आहे.
    • मुंबईत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी appointment@nanvatihospital.org ही वेबसाइट मदत करते.
    • रांचीमध्ये राहणाऱ्यांसाठी https://localsay.in/beds
    • याशिवाय इतरही काही वेबसाइट्स आहेत.
      readytofightcovid.in
    • www.cipla.com
    • https://dhoondh.com
    • http://needplasma.in/

    या संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्हाला बेड, प्लाझ्मा, रेमडेसिव्हिर तसेच ऑक्सिजन इत्यादींसंदर्भात अद्ययावत माहिती मिळू शकते.

    List Of Important Websites To Track Bed, Oxygen, remedesivir and plasma, Check Yourself

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’