• Download App
    खोतकरांच्या गैरव्यवहारात विश्वास नांगरे-पाटील यांच्या कुटुंबियांचाही सहभाग, बायको- सासºयाने घेतला कारखाना विकत|Vishwas Nangre-Patil's family members also involved in Khotkar's malpractice, wife and father-in-law bought the factory

    खोतकरांच्या गैरव्यवहारात विश्वास नांगरे-पाटील यांच्या कुटुंबियांचाही सहभाग, बायको- सासºयाने घेतला कारखाना विकत

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : जालना सहकारी साखर कारखान्यात अर्जुन खोतकर मित्र परिवाराने भागीदारीत बेनामी व्यवहार केला आहे. भागधारकांमध्ये मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नी रुपाली विश्वास नांगरे-पाटील, सासरे पद्माकर मुळे यांचे नाव आहे.Vishwas Nangre-Patil’s family members also involved in Khotkar’s malpractice, wife and father-in-law bought the factory

    त्यामुळे विश्वास नांगरे-पाटलांनी हा बेनामी कारखाना विकत घेतला, असा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि तोपर्यत विश्वास नांगरे पाटलांना पोलिस दलातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.



    सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार माफिया सरकार आहे. कधी धमकी देऊन तर, कधी नौटंकी करून या सरकारचा कारभार चालला आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी धमकी दिली. मात्र, अनिल देशमुख यांच्यावर त्यांचे प्रेम आहे की, अजित पवार यांची त्यांना काळजी आहे. जरंडेश्वरमध्ये अजित पवार यांनी जे केले, तेच अर्जुन खोतकर यांनी जालना साखर कारखान्यात केले.

    पद्माकर मुळे, रूपाली विश्वास नांगरे-पाटील हे भागधारक आहेत. विश्वास नांगरे-पाटील यांना चौकशी होईपर्यंत सेवेतून मुक्त करावे, अशी मागणी करून नांगरे-पाटील म्हणाले, गेल्या चोवीस महिन्यांत आपण शंभर घोटाळे बाहेर काढले. सहा मंत्र्यांना अटक किंवा जेलची हवा खावी लागली.

    24 हून अधिक घोटाळ्यांची सीबीआय, आयकर विभाग, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 18 प्रकरणांत न्यायालय, लोकायुक्त, एनजीटी, ग्रीन प्राधिकरण, मानव अधिकार आयोग, पोलीस प्राधिकरणात सुनावणी सुरू आहे.

    Vishwas Nangre-Patil’s family members also involved in Khotkar’s malpractice, wife and father-in-law bought the factory

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ