• Download App
    ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन; पुण्यातील घरात आढळला मृतदेह Veteran actor Ravindra Mahajani passes away A dead body was found in a house in Pune

    ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन; पुण्यातील घरात आढळला मृतदेह

    तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असलेले रविंद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. Veteran actor Ravindra Mahajani passes away A dead body was found in a house in Pune

    रविंद्र महाजनी यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांनी कळवली होती. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना रविंद्र महाजनींचा मृतदेह आढळून आला. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा  पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी हा मुंबईत असतो, पोलिसांनी याबाबत त्याला कळवले असून, मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्याकडे सोपवला आहे. आज रविंद्र महाजनी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

    रवींद्र महाजनी यांनी आपल्या चार दशकाच्या कला प्रवासात अनेक उत्तम भूमिका साकारल्या मधुसूदन कालेकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनी यांना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. आणि त्यानंतर शांताराम बापूनी याचं नाटकाचा एक प्रयोग बघून महाजनी यांना झुंज या चित्रपटातं मुख्य भूमिका देऊ केली.आणि तिथून खऱ्या अर्थाने महाजनी यांना मराठी चित्रपट सृष्टीत ओळख निर्माण झाली. आणि मराठी चित्रपट सृष्टीला एक नवा तारा गवसला.

    त्यानंतर आराम हराम आहे, लक्ष्मीची पावलं, लक्ष्मी, मुंबईचा जावई, देवता, गोंधळात गोंधळ , यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले तर बेल भंडार, अपराधमीच केला, या नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर काम केलं.
    आत्ताच्या देऊळ बंद या सिनेमातं देखील त्यांनी काम होतं. त्यांच्या अशा या आकस्मित जाण्यांना सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Veteran actor Ravindra Mahajani passes away A dead body was found in a house in Pune

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!