प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानांमधून भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्याची सुरुवात मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून करण्यात येणार आहे. राज्यातील रास्तभाव रेशन दुकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.Vegetables and fruits will now be available in ration shops in Maharashtra; First experiment in Mumbai, Thane, Pune
फळे भाजीपाला विकण्यास परवानगी
राज्यात 50 हजारांहून अधिक रास्तभाव दुकाने आहेत. केवळ अन्नधान्यांच्या विक्रीवर अवलंबून असणा-या या दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध वस्तू, उत्पादने विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आता नोंदणीकृत शेतकरी उत्पादन कंपनीस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानांमधून शेतक-यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी परवानगी देण्याचे सरकारने ठरवले आहे.
सहा महिन्यांकरता परवानगी
त्यानुसार राज्य शासनाने आता मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतील रास्तभाव दुकानांमधून भाजीपाला व फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरता परवानगी दिली. अन्न व नागरी पुरवठा विभागाने सोमवारी त्याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे.
Vegetables and fruits will now be available in ration shops in Maharashtra; First experiment in Mumbai, Thane, Pune
महत्वाच्या बातम्या
- युरिया उपलब्धतेवर केंद्राचा खुलासा : केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले- देशात युरियाचा पुरेसा साठा, डिसेंबरपर्यंत आयात करण्याची गरज नाही
- Agni 4 Missile : भारताने केली अग्नी 4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 4000 किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता
- रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल : आधार लिंक केलेले IRCTC युझर्स एका महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकतील, जाणून घ्या प्रोसेस
- अपक्ष, छोट्या पक्षांकडून कोंडीने शिवसेनेची दमछाक; ठाकरे – पवारांचा त्यावर शक्तिप्रदर्शनाचा बुस्टर डोस!!