वृत्तसंस्था
पुणे : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, पुण्यात लशीचा साठा नसल्यामुळे बुधवारी (ता. 28) सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहेत. Vaccine stocks run out in Pune 150 vaccination centers will remain closed
पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन लावला होता. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर राज्य सरकारने भर दिला आहे. पण, पुण्यातच लसीचा साठा संपल्यामुळे पुण्यातील 150 लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहे.
कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार
पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस मिळणार नाही. मात्र , कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यांच्यासाठीच लसीकरण सुरू आहे. अन्य लोकांना मात्र लस मिळणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
Vaccine stocks run out in Pune 150 vaccination centers will remain closed
महत्त्वाच्या बातम्या
- विवाहानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत पती–पत्नीची सोनेरी कामगिरी, विश्वकरंडकात भारतास तीन सुवर्ण
- अमेरिकेत बिहार-झारखंडच्या डॉक्टरांनी सुरु केली टेलिमेडिसीन हेल्पलाइन सेवा, पाटण्याला औषधपुरवठाही
- देशात लशींचा खडखडाट, मर्यादित साठ्यांमुळे अनेक राज्यांसमोर आव्हानांचा डोंगर
- कोरोना लढ्यासाठी `गुगल`ची भारताला १३५ कोटींची मदत
- कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु