वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात तीन दिवस कोरोनाविरोधी लस दिली जाणार नाही. पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये गुरुवार, शनिवार आणि रविवारी लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळीच लसीकरण करण्यात येणार आहे. Vaccination closed for three days in Pune on Diwali !; Vaccination will take place in the Friday morning session
दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लशीचा पहिला डोस १८ वर्षांवरील १०० टक्के पुणेकरांनी घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
पुणेकरांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश ; म्हणाले – राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा
मुंबईच्या तुलनेत पुण्यात लसीकरण वेगाने सुरु आहे. दरम्यान, आता सणामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. दिवाळी पाडव्याला लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.
पुण्यात उद्या (गुरुवारी) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्यानं केंद्रावर लसीकरण होणार नाही. मात्र, शुक्रवारी सकाळी लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार आहे. त्यानंतर शनिवारी आणि रविवारीसुद्धा लसीकरण केंद्र बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.
Vaccination closed for three days in Pune on Diwali !; Vaccination will take place in the Friday morning session
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान