• Download App
    Union Minister Ramdas Athawale criticizes Sharad Pawar and Uddhav Thackeray

    ‘’… किंवा शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवारही होऊ शकले असते’’ रामदास आठवलेंचं विधान!

    The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

    उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांचेही वाईट दिवस सुरू झाले, असंही आठवलेंनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात महाबंडखोरी झाल्याने, शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एवढच नाहीतर अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला असून, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकल्याने, शरद पवारांची डोकेदुखी वाढली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना, शरद  पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. Union Minister Ramdas Athawale criticizes Sharad Pawar and Uddhav Thackeray

    पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, ‘’उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांचेही वाईट दिवस सुरू झाले आहेत. त्यांनी (शरद पवार) (भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी) युती केली असती, तर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळू शकले असते किंवा ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवारही होऊ शकले असते.’’

    याचबरोबर, ‘’शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवे होते. मी दोन्ही पक्षांना (भाजप आणि शिवसेना) हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला होता, पण तसे झाले नाही. होय, पण अमित शाह यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला नव्हता. भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला’दिल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठा दावा केला आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबतीतही तेच होणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीची ताकद अजित पवार यांच्यामुळेच होती, आता ते भाजपासोबत आल्याने राष्ट्रवादीची अवस्था गंभीर झाली आहे. असेही ते म्हणाले.

    Union Minister Ramdas Athawale criticizes Sharad Pawar and Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा