प्रतिनिधी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी नागपूरातील कोविड स्थितीत आजवर महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. Union minister nitin gadkari initiated majors to prevent corona pandamic in Nagpur and vidarbha
- रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी सन फार्मा’चे दिलीप सिंघवी यांच्याशी पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यानंतर आजवर नागपूरात ४९०० व विदर्भात ५०० इंजेक्शन्स पोहोचले आहेत.
- मायलॉन लॅबरॉटरीज’चे भारतातील सीईओ श्री राकेश बोमजाई यांच्याशीदेखील दूरध्वनीवरून संपर्क केला होता. त्यानंतर मायलॉनकडून आजवर नागपूरसाठी ६००० रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करण्यात आली आहे.
- अवघ्या पाच दिवसात असे एकूण ११४०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स नागपूरला मिळाले आहेत.
- रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात मा. पंतप्रधान व केंद्रीय मंत्री श्री मनसुख मांडवीय यांच्याशीदेखील श्री गडकरीजी यांनी दूरध्वनीवरून पाठपूरावा केला असून रेमडेसिवीरची निर्मिती 10 लक्ष वायल प्रति महिना वाढवण्यास व नवीन प्रकल्प सुरू करण्यास मंजूरी मिळवून दिली. याचा केवळ नागपूरलाच नाही, तर संपूर्ण राज्याला फायदा होणार आहे.
- नागपूरमध्ये ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी ‘भिलाई स्टील प्लॉट’शी संपर्क साधून ३० टन ऑक्सिजन मिळवून दिले. हा ऑक्सिजन वितरित करण्यासाठी विशाखापट्टणम येथून टँकरचीही सुविधा उपलब्ध करून दिली.
- नागपूरसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) मिळवून देण्यासाठीदेखील श्री गडकरीजी प्रयत्नशील असून लवकरच १००० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- नागपूरातील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता लक्षात घेता विशाखापट्टणम येथील एमपीझेड द्वारा निर्मित (किंमत केवळ २ लक्ष रुपये) १००० व्हेंटिलेटर्स नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यासाठीही गडकरीजी प्रयत्नशील आहेत.
- नागपूर एम्स’मध्ये केवळ दोन दिवसांत ६० वरून ५०० बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर येथे तातडीने २०० बेड्सना मंजूरी मिळवून देण्यात आली आहे.
- जी रुग्णालये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त बेड्स वाढवून मागत आहेत, त्यांना २४ तासांत सदर परवानगी मिळवून देण्याचे निर्देश गडकरीजी यांनी दिले आहेत.
- नागपूरात आर-टीपीसीआर टेस्ट तातडीने व्हाव्यात यासाठी स्पाईस जेट (हेल्थ) चे मालक अजय सिंह यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा करून आर-टीपीसीआर टेस्ट साठी नागपूरला दोन मोबाईल चाचणी लॅब देण्याची विनंती केली . स्पाईस हेल्थ ने ही विनंती मान्य करत मोबाईल टेस्ट लॅब ताबडतोब नागपूरला पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे . या एका लॅब मधे ३५० रुपयात प्रती दिन ३००० लोकांच्या चाचण्या होतील .
Union minister nitin gadkari initiated majors to prevent corona pandamic in Nagpur and vidarbha
- बातम्या
लॉकडाऊनमध्ये शेतकरी आंदोलन सुरूच ठेवणार ; शेतकरी नेते राकेश टीकैत यांची अडेलतट्टू भूमिका
नागपूर, विदर्भात कोविड अटकावासाठी नितीन गडकरी यांच्याकडून महत्तपूर्ण पावले