वृत्तसंस्था
मुंबई : काही लोकांनी माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेतला आहे, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. Union minister Narayan Rane slams media over coverage
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. रत्नागिरीवरून सकाळी साडेपाच वाजता मी मुंबईत पोचलो. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. याचा अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं आहे.
१७ सप्टेंबरपर्यंत कोर्टाची केस असल्याने मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही. पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं योग्य वाटलं नाही. म्हणून पत्रकारांना दौऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे, असं राणेंनी सांगितलं.
घडामोडींवर लक्ष ठेवून होतो
माझ्या त्या पत्रकार परिषदेनंतर मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. काही जण माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा माझा गैरफायदा घेत असल्याचे माझ्या लक्षात आले आहे, असं राणे यांनी सांगितलं. तुमच्या चांगुलपणाचा कुणी गैरफायदा घेतला? असा सवाल राणेंना करण्यात आला.
त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी माझा गैरफायदा घेतला, असं स्पष्ट केलं. यावेळी राणेंना कोणते पत्रकार आहे त्यांचे नाव सांगा असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र, राणे केवळ हसले. त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.
Union minister Narayan Rane slams media over coverage
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबचे झाले थोडे, तोच छत्तीसगडमधून आले “वादाचे घोडे”; मुख्यमंत्री भूपेश बघेलांविरुद्ध मंत्री टी. एस. सिंगदेव यांचे बंड
- दुबईमध्ये उघडेल आता जगातील सर्वात उंच ऑब्जर्वेशन व्हील , लंडन आयच्या उंचीपेक्षाही असेल दुप्पट
- अफगाणिस्तानच्या आयटी मंत्र्यांवर जर्मनीत पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, मंत्रिपदी असताना देशात सेल फोन नेटवर्क वाढवले
- केवळ ४००० अमेरिकी नागरिक आणायचे होते, मग २६,००० एअरलिफ्ट कसे केले? दहशतवादी तर आणले नाहीत ना? ट्रम्प यांची बायडेन सरकारवर कडाडून टीका