वृत्तसंस्था
चिपळूण – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर लगेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलीसांनी अटक केली आहे. Union Minister Narayan Rane arrested by Ratnagiri police
काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.
एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून एका केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. रत्नागिरी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. यातून तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत? तुम्ही लाथा घाला म्हणता त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत? कोणी चौकीदार चोर आहे म्हणते त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत?,” असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. सरकारची दुटप्पी भूमिका योग्य नाही. भूमिका एकच राहिली पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
फडणवीस यांनी खासगी आयुष्यावरुन होणाऱ्या टीकेसंदर्भात आपण कधीही मुद्दा उपस्थित केला नसल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, की आमचे तर आम्ही बोलतच नाही, आमच्याविरुद्ध आमच्या परिवाराविरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, पत्नीविरुद्ध तुम्ही काय काय केले. तो आमचा वैयक्तिक मामला आहे. आम्ही त्याला सक्षम आहोत. तो माझा प्रश्नच नाही. पण मी एवढेच सांगू शकतो की दुटप्पी भूमिका असू नये. या विधानातून त्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर त्यांच्या सोशल मीडियातून होणाऱ्या अश्लाघ्य टीकेबद्दल अप्रत्यक्षपणे वक्तव्य केले.
Union Minister Narayan Rane arrested by Ratnagiri police
महत्त्वाच्या बातम्या
- राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही पण अटक करण्याऐवजी समज द्यावी, चंद्रकांत पाटील यांची भूमिका
- नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक अन् शिवसैनिक भिडले
- काबूलहून विमान हायजॅक, युक्रेनहून बचाव मोहिमेवर आले होते, आता इराणने केला हा दावा
- WATCH : शर्जिल उस्मानीने भारतमातेला शिव्या घातल्या तेव्हा यांनी शेपट्या टाकल्या, आता मात्र अख्खी पोलीस फोर्सच मागे लावलीय!; फडणवीसांचा हल्लाबोल