• Download App
    सहकार परिषद : हजारो कोटींचे घोटाळे कुणी केले?, मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलोय... काय म्हणाले अमित शाह? वाचा सविस्तर...। Union Minister Amit Shah At Co oprative Council in Pravaranagar Ahmednagar With Vikhe Patil Fadnavis

    सहकार परिषद : हजारो कोटींचे घोटाळे कुणी केले?, मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलोय… काय म्हणाले अमित शाह? वाचा सविस्तर…

    देशाचे गृहमंत्री व नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रवरानगरात देशातली पहिली सहकार परिषद पार पडत आहे. तत्पूर्वी, अमित शाह यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. या सहकार परिषदेला भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती आहे. Union Minister Amit Shah At Co oprative Council in Pravaranagar Ahmednagar With Vikhe Patil Fadnavis


    प्रतिनिधी

    अहमदनगर : देशाचे गृहमंत्री व नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रवरानगरात देशातली पहिली सहकार परिषद पार पडत आहे. तत्पूर्वी, अमित शाह यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. या सहकार परिषदेला भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती आहे.

    पहिल्या सहकार परिषदेत काय म्हणाले अमित शाह?

    मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शाह यांच्यावर आहे. यानंतर त्यांचा पहिलाच राज्याचा दौरा आहे. या पहिल्यावहिल्या सहकार परिषदेत ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्याच्या पायावर आपला देश उभा आहे. या भूमीत आल्यावर मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो. ही भूमी संत ज्ञानेश्वरांची आहे, त्यांनी भक्ती आंदोलनाची सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं. ही भूमी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांची आहे. साईबाबांनी जगाला विश्वबंधुत्व आणि सर्वधर्मसमभाव दिला, त्यांना अभिवादन करतो. प्रवरानगरची माती काशीएवढीच पवित्र. या मातीत सहकाराची पायाभरणी झाली. पद्मश्री विखे पाटील आणि गाडगीळ साहेबांनी सहकाराच्या चळवळीला गती दिली. देशात सहकाराच्या क्षेत्राला काम करणाऱ्यांनी प्रवरानगरला येऊन इथली माती कपाळी लावावी, असंही ते म्हणाले.

    हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला?

    अमित शाह पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपर्यंत कुणाला सहकार मंत्रालय स्थापन करावं वाटलं नाही. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. मात्र, सहकारातल्या व्यक्तींनी दोषांतून स्वत:ला मुक्त करण्याची जबाबदारी आपली आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवालही त्यांनी केला.

    शाह पुढे म्हणाले की, सहकारी बँकांच्या पाठीशी मोदी आहेत. व्यावसायिक तरुणांच्या हाती सहकार चळवळ द्यावी लागेल. पद्मश्री विखे पाटलांनी सुरू केलेल्या सहकारी चळवळीला अजून शंभर वर्षे पुढे घेऊन जायचं आहे. सहकार चळवळीसाठी नरेंद्र मोदी सरकार 24 तास काम करत आहेत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी स्थापन केलेला सहकारी कारखाना अजून सहकारी आहे याचा आनंद आहे. सहकाराच्या इतिहासाला जागृत करायला हवे.

    ते पुढे म्हणाले की, लिज्जत पापड, अमूलचा अभ्यास करायला जगभरातून लोक येतात. साखर कारखान्याचे सुरू राहावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकही साखर कारखाना प्रायव्हेट होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय. मी सहकार तोडायला नाही तर जोडायला आलो आहे. राज्य सरकारने राजकारणापलीकडे जाऊन विचार करावा. राज्य सरकारने संस्थांवर कोण आहेत हे बघावं. आम्हाला सल्ला देण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा, आम्ही मूक प्रेक्षक बनून हे पाहू शकत नाही. माझ्यासमोर एखादा विषय आल्यावर सहकारी संस्था कोण चालवतोय, यापेक्षा ती कशी चालतेय हे मी पाहणार आहे. पण राज्य सरकारनंही हे करावं. पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन सहकार नीती आणणार आहे. महाराष्ट्रातील सहकार मजबूत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून राज्यातील सहकार टिकवणं आणि वाढवण्याचा प्रयत्न करणार, असंही ते म्हणाले.

    Union Minister Amit Shah At Co oprative Council in Pravaranagar Ahmednagar With Vikhe Patil Fadnavis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस