• Download App
    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण, तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैद आहे कुख्यात गँगस्टर । Underworld don Chhota Rajan corona Positive, jailed in Tihar High Security Cell

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण, तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैद आहे कुख्यात गँगस्टर

    Chhota Rajan corona Positive : तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैदेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झाली आहे. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सध्या त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. Underworld don Chhota Rajan corona Positive, jailed in Tihar High Security Cell


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैदेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झाली आहे. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सध्या त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

    कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर छोटा राजनची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. गुरुवारी छोटा राजनला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. छोटा राजनला लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना कोरोना तपासणी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

    छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तास तिहार जेलचे महासंचालक संदीप गोयल यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्याची प्रकृती ठीक आहे आणि तुरुंगातील रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी तुरुंगातील क्रमांक दोनच्या याच सिक्युरिटी सेलमध्ये बिहारचे बाहुबली आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

    तुरुंग रुग्णालयात उपचारांनंतर त्यांना दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही तुरुंग क्रमांक दोनच्या हाय सिक्युरिटी सेलमध्ये बंद आहेत. दोघांची सुरक्षा खूपच कडेकोट आहे. तुरुंगातील विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच दोघांना भेटण्याची परवानगी आहे.

    तिहारच्या तुरुंग क्रमांक दोनमध्ये रुग्ण आढळल्यानंतर छोटा राजनलाही संसर्ग झाला. लक्षणे जाणवतच त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तुरुंगाधिकाऱ्यांच्या मते, तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या कैद्यांना वेगळे ठेवले जात आहे. त्यांची टेस्टही केली जात आहे. त्याचबरोबर कारागृह रुग्णालयाच्या डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त कैद्यांची कोरोना टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    Underworld don Chhota Rajan corona Positive, jailed in Tihar High Security Cell

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना