विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात काँग्रेसने मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम राबविला आहे. पण, गंमत अशी आहे की, या दुरुस्तीच्या कट्ट्यावर चक्क भाजपच्या झेंड्याच्या रंगाची आणि कमळ चिन्ह असलेली छत्री एका फोटोत दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला असून ‘ काका द ग्रेट’ छत्रीचा लाभ कमळाकडून आणि दुरुस्ती मात्र पंज्याकडून व्वा.. याला म्हणतात …पुणेकर ३०, अशा आशयाची भन्नाट ओळही फोटोवर आहे. Uncle The Great’s umbrella benefits from lotus
एका काकांनी अन्य ग्राहकांप्रमाणे आपली ही छत्री दुरुस्तीसाठी आणली असावी. त्यात त्यांचा कोणताच दोष नाही. पण, नजरेस आला तो पुणेरी बाणा. विशेष म्हणजे काँग्रेसच्या मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमाचा एक फलकही कट्टयामागे झळकत आहे. त्यावर लोकसभा निवडणूक लढविलेले काँग्रेसचे नेते मोहन जोशी आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे छायाचित्र असून अन्य नेत्यांची नावेही झळकत आहेत. त्यावर मोफत छत्री दुरुस्ती करून दिली जाईल, असे म्हंटले आहे. जमिनीवर काही छत्र्याही मांडल्या आहेत. तेथे काकांची छत्रीही दिसते.
पुण्यातील प्रतिष्ठेच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात भाजपतर्फे गिरीश बापट आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्यात तुल्यबळ लढत झाली. त्यात बापट हे विजयी झाले होते.