• Download App
    जीएसटीबाबत थकबाकीपोटी उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया|Uddhav Thackeray reacts sharply to GST arrears

    जीएसटीबाबत थकबाकीपोटी उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीत जीएसटीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. Uddhav Thackeray reacts sharply to GST arrears

    महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के आहे.संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त १५ टक्के जीएसटी गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे तरीही महाराष्ट्राला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, असे त्यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले.



    तर देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. पण   सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. पण कोरोनाचा मूळ मुद्दा बाजूला सारत मोदी यांनी इंधन दरवाढीवरून महाराष्ट्र आणि  पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांवर टीका केली.

    गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र, पश्चिम बंगालने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. मुंबईपेक्षा दीव दमणमध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त आहेत. पेट्रोल, डिझेलवरील कर केंद्र सरकारने कमी केले आहेत. भारत सरकारचा ४२ टक्के महसूल राज्यांना दिला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याच्या आणि शेजारच्या राज्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

    Uddhav Thackeray reacts sharply to GST arrears

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू