Saturday, 10 May 2025
  • Download App
    उद्धव ठाकरे : शिवसेना फुटी पूर्वी "घरात बसा"; नंतर मात्र लावला बैठकांचा सपाट!!Uddhav Thackeray holds daily Meetings of Shivsena after major split

    उद्धव ठाकरे : शिवसेना फुटी पूर्वी “घरात बसा”; नंतर मात्र लावला बैठकांचा सपाट!!

    विनायक ढेरे

    नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या एकापाठोपाठ एक बैठकांचा सपाटा लावला आहे. हे म्हणजे असे झाले शिवसेना फुटी पूर्वी घरात बसा आणि नंतर मात्र लावला बैठकांचा सपाटा!! Uddhav Thackeray holds daily Meetings of Shivsena after major split

    आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या माजी आमदारांची बैठक घेतली आणि त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले. या बैठकीला शिवसेनेचे 35 माजी आमदार उपस्थित होते. याचा अर्थ या सगळ्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची लालूच दाखवण्यात आली आहे. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या मागणी पुढे उद्धव ठाकरे यांनी मान तुकविल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी शिवसेना उर्वरित फुटी पासून वाचवणे आणि माजी आमदारांच्या बळावर संघटना टिकवून ठेवणे, असे दुहेरी आव्हान सध्या उद्धव ठाकरे यांच्या पुढे आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत आहे.



    परंतु हेच ते उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये कोरोनामुळे शिवसेना पक्ष संघटनेच्या बैठका घेतल्या नव्हत्या. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षभरात देखील त्यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीकडे दुर्लक्ष केले. हे आरोप फक्त प्रसार माध्यमांमधून झाले असे नाही, तर शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी अनेकदा उघडपणे संघटने अंतर्गत देखील बोलून दाखविले. परंतु, शिवसेनेत फूट पडून 40 आमदार बाहेर पडेपर्यंत उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर शिवसेनेच्या बैठका घेतल्या असल्याचे आढळले नव्हते. शिवसेनेत दोन तृतीयांश पेक्षा जास्त मोठी फूट पडली. 40 आमदार निघून गेले. सरकार गडगडले.

    नवीन सरकार स्थापन झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संघटना वाचवण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. पण हे करताना अखेरीस शिवसेनेच्या खासदारांच्या मागणी पुढे त्यांना मान तुकवावी लागली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा देऊन उभे केलेले उमेदवार यशवंत सिन्हा यांना निवडणुकीत पाडतील. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी तो भाजपला पाठिंबा नाही, असे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. तरी देखील शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या मागणी पुढे उद्धव ठाकरे यांना झुकावे लागल्याची वस्तूस्थिती लपलेली नाही.

    त्याचबरोबर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मराठी माध्यमांनी वगळलेला दिसतो, तो म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात फक्त सध्या कागदावर राहिलेली महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गाने पुढे सरकताना दिसत आहे. कारण शरद पवारांच्या उमेदवाराला शिवसेनेचे खासदार मतदान करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे एवढे करून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला निमंत्रण मिळाले आहे.

    Uddhav Thackeray holds daily Meetings of Shivsena after major split

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा