विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्यसभेतील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भेटण्यासाठी ते अधिवेशन सोडून आले होते. चार दिवसांपूर्वी दिल्लीतून परतल्यानंतर उदयनराजेंना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.Udayan Raje Bhosale corona positive
खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला करोनाबाधित झाल्या होत्या. उपचाराअंती करोनावर मात केल्यानंतर कल्पनाराजे भोसले यांना घरी सोडण्यात आलं. मात्र पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.यावेळी उदयनराजे हे देखील संपर्कात आल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आणि करोनाची काही लक्षणेही आढळली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आता उदयनराजे यांची प्रकृती उत्तम असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितलं. मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून त्या घरी परतल्या आहेत. तसंच, पुढील एक-दोन दिवसात उदयनराजेंनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
Udayan Raje Bhosale corona positive
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरने झटका दिल्यावर आता फेसबुकचीही राहूल गांधींना नोटीस, इन्स्टाग्रामवरील ती पोस्ट त्वरित हटविण्याचे आदेश
- आंध्र प्रदेश सरकारची लपवालपवी, आता सरकारी आदेश, अध्यादेश वेबसाईटवर टाकणार नाही
- डाव्या आघाडीच्या राजकारणामुळे केरळमध्ये कोरोना वाढतोय, महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केंद्र बनतोय, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल
- तालीबानची सत्ता आल्यावर अफगाणी चलनात विक्रमी घसरण, मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नरही गेले पळून