विशेष प्रतिनिधी
अंधेरी : प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुरभी श्रीवास्तव (वय २५) आणि मोसिना मुख्तार शेख (वय १९) या दोन अभिनेत्रींना चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनमध्ये काम थांबल्याने आर्थिक चणचण भासत असल्याने चोरी केल्याचे त्यांनी चौकशीत कबुल केले आहे.Two actress arrested for robbery
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त आरोपी अभिनेत्रींनी अनेक वेब सीरिज व चित्रपटांमध्ये काम केले आहे. आरोपींकडून ६० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.लॉकडाऊनमध्ये मालिकांचे शूटिंग बंद झाल्याने त्यांच्या उत्पन्नाचा स्रोतच बंद झाला.
त्यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यांचा एक मित्र आरे कॉलनी परिसरात पेईंग गेस्टची व्यवस्था करतो. त्याच्या मदतीने दोघीही १८ मे रोजी एका व्यक्तीच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून गेल्या. तेथे आणखी एक जण पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. त्याने घरातील लॉकरमध्ये ३ लाख २८ हजार रुपये ठेवले होते. संधी मिळताच दोघींनी हे पैसे घेऊन पलायन केले.
तपासादरम्यान, पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसी टीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघी पैशांचे बंडल घेऊन सोसायटीच्या बाहेर येताना दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची चौकशी केली असता दोघींनी गुन्ह्याची कबुली दिली.
Two actress arrested for robbery
महत्त्वाच्या बातम्या
- लोकसंख्या नियंत्रणासाठी दाखविले योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्वा सरमा यांचे धाडस, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दोन अपत्ये धोरण, आसाममध्ये सुरूवात तर उत्तर प्रदेशात तयारी
- चौकशीसाठी येण्याची टाळाटाळ करणाऱ्या फेसबुकला संसदीय समितीने फटकारले
- आत्मनिर्भर खादीने दिला व्होकल फॉर लोकलचा नारा, कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाची विक्रमी उलाढाल
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तयारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निटकवर्तीय ए. के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
- GOOD NEWS : आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी ; काय आहेत नवे नियम ; वाचा सविस्तर