विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना इन्चार्ज करून कॉन्सन्ट्रेट केले असताना, त्या पाठोपाठ स्वतः राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत असताना “अचानक” भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी घराणेशाही वर हल्लाबोल करत बारामतीतून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मागचे नेमके “रहस्य” काय आहे??, हा खरा प्रश्न आहे.Turpti desai political ambitions to fight from baramati loksabha constituency, but is it a escape root for supriya sule??
तृप्ती देसाई यांनी वेगवेगळ्या माध्यमांशी बोलताना आपल्याला आम आदमी पार्टी कडून बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घेण्यासंदर्भात प्रपोजल आल्याचे सांगितले आहे. त्याच वेळी भाजप पासून राष्ट्रवादी पर्यंत कोणत्याही पक्षाने ऑफर दिली, तर आपण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तृप्ती देसाई यांनी “अचानक” घेतलेल्या राजकीय पवित्र्यामागे नेमके रहस्य काय आहे??, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
बारामतीत असे नेमके काय घडत आहे की ज्यामुळे तृप्ती देसाई भाजपपासून ते थेट राष्ट्रवादीपर्यंत कोणत्याही पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी करायला तयार आहेत?? त्यांना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे नकोत. कारण त्या तीन टर्म खासदार राहिल्या आहेत आणि बारामती तालुका वगळून इतर तालुक्यांचा विकास झाला नाही, असे तृप्ती देसाईंचे म्हणणे आहे. बारामतीतून आधी शरद पवार आणि नंतर सुप्रिया सुळे यांनाच जनतेने निवडून द्यायचे, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायचा का??, असा बोचरा वाटणारा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे. बाकीचे त्यांचे सर्व भाष्य घराणेशाही विरोधात आहेत आणि म्हणूनच तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची “अचानक” इच्छा व्यक्त करण्यामागे सुप्रिया सुळे यांच्यासाठी राष्ट्रवादी बारामतीतून काही वेगळ्या कारणांसाठी “एस्केप रूट” तर तयार करत नाहीत ना??, अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
पवारांची माढातून माघार
2019 मध्ये बारामतीत नव्हे, पण माढा लोकसभा मतदारसंघात अशीच घटना घडली आहे. त्यावेळी माढा मतदारसंघातून लोकसभाची निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवारांनी स्वतः जाहीर केले होते, पण त्यानंतर पार्थ पवार राजकीय एपिसोड घडला आणि एकाच घराण्यातून तीन उमेदवार नकोत, असे सांगून शरद पवारांनी पार्थ पवारांना मावळ मधून उमेदवारी दिली आणि स्वतः माढा मतदारसंघातून माघार घेतली होती. 2014 च्या मोदी लाटेत देखील पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी त्यावेळी राज्यसभेत जाणे पसंत केले होते.
2014, 2019 आणि 2024 या तीन लोकसभा निवडणुकांचा कॉमन फॅक्टर काढला, तर मोदी प्रभाव ते मोदी लाट असा दिसतो आहे आणि प्रभावापासून लाटेपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघातले दिग्गज आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये पराभूत झाल्याचा इतिहास वर्तमान आणि भविष्य आहे. मग नेमके तेच ओळखून शरद पवारांनी 2014 आणि 2019 मध्ये स्वतःसाठी “एस्केप रूट” शोधला होता. तसाच “एस्केप रूट” बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी शोधण्यात येतो आहे का?? हा अत्यंत महत्त्वाचा किंबहुना कळीचा मुद्दा आहे.
अन्यथा तृप्ती देसाई यांची राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून येणे ती देखील बारामती लोकसभा मतदारसंघात थेट सुप्रिया सुळे यांच्याशी टक्कर घेण्याची त्यांनी तयारी सुरू करणे याचा दुसरा अर्थ लागत नाही!!
सुप्रियांची विधानसभा निवडणूक चाचपणी
त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणखी एक वेगळी राजकीय शक्यता भविष्यात खुणावत आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक बारामतीतून लढविण्यापेक्षा विधानसभेची निवडणूक लढवून मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आपली हॅट टाकणे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडून “सरप्राईज एलिमेंट” असू शकते. मग त्यासाठी थेट भाजपचा कोणताही हार्डकोअर कार्यकर्ता अथवा नेता आपल्यासमोर उभा राहण्यापूर्वी आपल्याशी संबंधित असलेला किंवा विचारसरणीशी संलग्नता राखणारा एखादा कार्यकर्ता समोर आणणे हाही वेगळा भाग तृप्ती देसाईंच्या खेळीमागे असू शकतो!!
बारामतीतल्या महत्त्वाकांक्षांचे मॅनेजमेंट
तशाही बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराणे वगळता अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वर्षानुवर्षे दबलेल्या आहेत. त्या त्या दबलेल्या महत्त्वाकांक्षांचे “पॉलिटिकल मॅनेजमेंट” करणे हे पवारांचे अनेक वर्षांचे राजकीय कौशल्य राहिले आहे. मग याच कौशल्यातून तृप्ती देसाई यांची राजकीय महत्त्वाकांक्षा अचानक पुढे आली नाही ना!!, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Turpti desai political ambitions to fight from baramati loksabha constituency, but is it a escape root for supriya sule??
महत्वाच्या बातम्या
- सावरकर गौरव यात्रा : मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही घुसेगा; देवेंद्र फडणवीसांचा प्रहार–
- ‘’उद्धव ठाकरे… फडतूस नही काडतूस हू मै, झुकेंगा नही साला घुसेंगा’’ देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा!
- Covid19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत करोना संसर्गाचे ७११ नवीन रुग्ण, चार जणांचा मृत्यू
- China Arunachal rename: चीनकडून कुरापती सुरूच; आता अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली!