• Download App
    महाराष्ट्र पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : जयजितसिंग यांच्या जागी आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख।Transfers of senior officers in Maharashtra Police Force: Jayjit Singh has been replaced by IPS officer Vineet Agarwal, who heads the Maharashtra ATS

    महाराष्ट्र पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : जयजितसिंग यांच्या जागी आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख

    जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त ; विनीत अग्रवाल ATS चे नवे प्रमुख.Transfers of senior officers in Maharashtra Police Force: Jayjit Singh has been replaced by IPS officer Vineet Agarwal, who heads the Maharashtra ATS


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अँटेलिया बाँब आणि मनसुख हिरेन प्रकरणात परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आज पहिल्यांदाच बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील तीन प्रमुख आयपीएस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. त्यात जयजितसिंग, संजय सक्सेना आणि विनीत अग्रवाल या तीन आयपीएस अधिकार्यांचा समावेश आहे.



    विनीत अग्रवाल यांची दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . श्री. विनीत यांनी जयजितसिंग यांची जागा घेतली तर संजय सक्सेना यांना अग्रवाल यांच्याजागी गृह मंत्रालयाचे प्रधान सचिव (विशेष) म्हणून नियुक्ती दिली गेली आहे.विनीत अग्रवाल हे १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यात सुरुवातीला मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ATS चे प्रमुख जयजीत सिंग यांना ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे.

    जयजीत सिंग हे सध्या दहशतवादविरोधी पथकात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जागेवर विनीत अग्रवाल यांच्याकडे ATS चा पदभार सोपवण्यात आला आहे. ठाण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पदोन्नती मिळून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस महानिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

    कोण आहेत जयजीत सिंग, जाणून घ्या…

    • जयजीत सिंग १९९० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी
    • ऑक्टोबर २०२० मध्ये जयजीत यांच्याकडे ATS ची जबाबदारी आली
    • त्याआधी जयजीत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरीक्त पोलीस महासंचालक म्हणूनही काम केलंय.
    • त्याआधी जयजीत सिंग मुंबई रेल्वे पोलीस अतिरीक्त महासंचाक म्हणून कार्यरत होते.

    Transfers of senior officers in Maharashtra Police Force: Jayjit Singh has been replaced by IPS officer Vineet Agarwal, who heads the Maharashtra ATS

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ