BMC वर स्थानिकांकडून संताप, रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नाही. Municipal Corporation’s affairs on the rise! A 24-year-old patient died at Rajwadi Hospital after being bitten by a rat
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. श्रीनिवास यलप्पा ( वय 24 वर्ष) असं या रुग्णाचं नाव असून या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.हे धक्कादायक आहे .
मुंबई सारख्या ठिकाणी एका नामांकित रूग्णालयात काही दिवसांपूर्वी श्रीनिवास राजावाडी रुग्णालयात दाखल झाला होता. दम लागत असल्यामुळे श्रीनिवासच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय तपासणी केली असता श्रीनिवासला लिव्हरचा प्रॉब्लेम असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. श्रीनिवासच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. Tragic: Mumbai
परंतू या निमीत्ताने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील स्वच्छतेचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. आज सकाळी राजावाडी रुग्णालयाच्या परिसरात साचलेला कचराही साफ करण्यात आला. परंतू ICU सारख्या ठिकाणी उंदराने प्रवेश करुन रुग्णाचा डोळा कुरतडल्यामुळे महापालिकेच्या कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Tragic: Mumbai Municipal Corporation’s affairs on the rise! A 24-year-old patient died at Rajwadi Hospital after being bitten by a rat
महत्त्वाच्या बातम्या
- लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, फायजर लसीला परवानगी, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती
- मोदी सरकार देणार कामगारांना भेट, अर्जित सुट्यांची संख्या होणार ३००, नव्या कामगार कायद्याबाबत बैठक
- भारताचे गुंतवणूक गुरू राकेश झुनझुनवाला म्हणतात, पैंज लावा कोरोनाची तिसरी लाट येणार नाही
- केंद्र सरकार करणार खर्चात काटकसर, हवाई प्रवास, बैठकांतील चहा, नाष्टयाचा खर्च होणार कमी
- नीरव मोदीला भारतात आणणारच, ब्रिटन न्यायालयाने प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळली