Thursday, 8 May 2025
  • Download App
    वेळच आवरा, अन्‍यथा तुमच्‍याही घराच्‍या काचा फुटतील ; शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा विरोधकांना इशारा । Time will tell, otherwise the glass of your house will break; Shiv Sena MP Sanjay Raut's warning to the opposition

    वेळच आवरा, अन्‍यथा तुमच्‍याही घराच्‍या काचा फुटतील ; शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

    राऊत पुढे म्हणाले की राजकारणात आरोप प्रत्‍यारोप होण साहजिकच आहे आणि हे आरोप प्रत्यारोप वारंवार होत असतात. Time will tell, otherwise the glass of your house will break; Shiv Sena MP Sanjay Raut’s warning to the opposition


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे.भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर विरोधी पक्ष नेत्‍यांविरोधात करत आहे. महाराष्‍ट्राने यापूर्वी तपास यंत्रणांचा असा गैरवापर कधीच पाहिलेला नाही.अस शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

    पुढे राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे की , “ज्यांची घरे काचेची असतात त्‍यांनी दुसर्‍यांच्‍या घरावर दगडफेक करु नये. कारण आमच्‍याविरोधात दगडफेक कराल तर आमच्‍या हातातही दगड आहे. वेळच आवरा, अन्‍यथा तुमच्‍याही घराच्‍या काचा फुटतील.”

    राऊत पुढे म्हणाले की राजकारणात आरोप प्रत्‍यारोप होण साहजिकच आहे आणि हे आरोप प्रत्यारोप वारंवार होत असतात. मात्र भाजपचे नेत्‍यांनी शरद पवारांवर टीका करताना भाजप नेत्‍यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्‍ट्रात अशा प्रकरणाची चिखलफेक होवू नये. भाजपच्‍या नेत्‍यांचे वागणं अयोग्‍य आहे, असे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.



    नवाब मलिक यांच्‍या जावयावर निराधार आरोप करण्‍यात आले. यामुळे त्‍यांना आठ महिने तुरुंगात रहावे लागले. याचा परिणाम मलिक यांच्‍या कुटुंबीयांवर झाला. तसेच आता नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर केलेले आरोप गंभीर आहेत. ज्‍यांच्‍यावर आरोप झालेत त्‍यांनी खुलासा करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.

    दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप यांची भेट घेतली. या भेटीमध्ये चुकीचे असे काहीच नाही. कारण या देशाची परंपरा अशी आहे की सर्वधर्मीयांचा आदर करा. मात्र अन्‍य राजकीय पक्षांच्‍या नेत्‍यांनी ही भेट घेतली असती तर भाजपने तत्‍काळ याचा विरोध केला असता. सर्वधर्मीयांचा आदर करा, असा संदेशच पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या समर्थकांना दिला आहे. आता त्‍यांच्‍या समर्थकांनी या संदेशाचे पालन करावे, अस देखील संजय राऊत म्‍हणाले.

    Time will tell, otherwise the glass of your house will break; Shiv Sena MP Sanjay Raut’s warning to the opposition

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण