वृत्तसंस्था
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे प्रकाशात आली आहेत. हा अनमोल ठेवा आढळल्याची माहिती शिवछत्रपतींच्या चित्रांचे संशोधन करणारे इतिहासाचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी दिली. याप्रसंगी भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्यवाह पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. Three paintings of Chhatrapati Shivaji Maharaj published; Research by historian Prasad Tare
महाराजांची ही चित्रे सतराव्या शतकातील आहेत. भारतातील दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत ती रेखाटली आहेत. मिनिएचर प्रकारची ही चित्रे तत्कालिन युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ती युरोपमध्ये गेली व नंतर वस्तू संग्रहालयात सुरक्षितपणे सांभाळली गेली. तारे म्हणाले, शिवकाळात भारतात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यापैकी कुतुबशाहाची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथे प्रचलित असलेल्या चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या प्रदीर्घ मोहिमेवर असताना ही चित्रे काढली आहेत किंवा त्या वेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने इसवीसन १७०० पर्यंत काढलेली आहेत.
पुढे तारे म्हणाले, या चित्रांच्या म्युझियम रेकॉर्डमध्ये ती चित्रे महाराजांची व सतराव्या शतकातील आहेत,असे स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच ती दख्खनी गोवळकोंडा शैलीची आहेत, असेही म्हटले आहे. त्यातील दोन चित्रांमध्ये पर्शियन व रोमन लिपीत महाराजांचे नाव लिहिलेले आहे. महाराजांव्यतिरिक्त अन्य अनेक भारतीय राजपुरुषांची चित्रे या वस्तुसंग्रहालयामध्ये आहेत ही सर्व चित्रे नैसर्गिक रंग आणि सोने वापरून रेखाटली आहेत. चित्रांचे चित्रकार अज्ञात आहेत. त्यातील एका चित्रासाठी पॅरिस येथील अभ्यासक शशी धर्माधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
शिवरायांचे आठवावे रूप..
चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार व पायात मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी व गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे मोजकेच अलंकार त्यांनी धारण केलेले दिसतात. करारी मुद्रा, बोलके डोळे व स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्ये चित्रात दिसतात.
चित्र १- जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयातील प्रस्तुत चित्रात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखविली आहे.
चित्र २ – पॅरिस येथील खाजगी वस्तुसंग्रहालयातील या चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र दाखविले आहे.
चित्र ३ – अमेरिका येथील फिलाडेल्फिया संग्रहातील या चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र व कमरेला कट्यार दाखविली आहे. युरोपमधून हे चित्र पुढे अमेरिकेत हस्तांतरित झाले.
Three paintings of Chhatrapati Shivaji Maharaj published; Research by historian Prasad Tare
विशेष प्रतिनिधी
- मराठा समाजाला उध्दव ठाकरेंनी वेड्यात काढले तर अशोक चव्हाणांनी वाटोळे केले, विनायक मेटे यांचा आरोप
- दिग्विजय सिंह पाकिस्तानची भाषा बोलाहेत, सोनिया आणि राहूल गांधींनी द्यावे उत्तर, क्लब हाऊस चॅट लिक झाल्यावर संबित पात्रा यांचा आरोप
- पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलणार, अकाली दल- बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे कॉँग्रेसच्या दलीत मतपेढीला लागणार सुरूंग
- औरंगजेबही आषाढी वारीची परंपरा बंद पाडू शकला नव्हता, ते पाप आघाडी सरकारने करू नये, भाजपाचे आवाहन
- सरकारने नाही लोकांनीच करून दाखविले, मुंबईतील धारावी, पुण्यातील भवानी पेठेत मिळाला नाही एकही कोरोना रुग्ण