• Download App
    ‘’तुमच्या सारखं आडनाव चोरून 'गांधी' झाले नाहीत’’ सावरकरांवरून काँग्रेसने केलेल्या टिप्पणीवर भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार!They did not become Gandhi by stealing their last names like you BJPs counterattack on Rahul Gandhi on Congress comment on Savarkar

    ‘’तुमच्या सारखं आडनाव चोरून ‘गांधी’ झाले नाहीत’’ सावरकरांवरून काँग्रेसने केलेल्या टिप्पणीवर भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार!

    राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जाऊन भारताबाबत जी विधानं केलं, त्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. 

    प्रतिनिधी

    मुंबई  : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जाऊन भारताबाबत जी विधानं केलं, त्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.  भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, राहुल गांधींनी संसदेत जाहीर माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने राहुल गांधी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. They did not become Gandhi by stealing their last names like you BJPs counterattack on Rahul Gandhi on Congress comment on Savarkar

    काँग्रेसच्या सावरकर समझा क्या… ट्विटला सावरकर म्हणजे तिखट; भाजपचे प्रत्युत्तर!!

    एवढच नाही तर काँग्रेसने उलट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करणारं ट्वीट करून, भाजपाल डिवचलं आहे. ज्याला भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. काँग्रेसने राहुल गांधी माफी मागणार नाहीत, असे सांगत सावरकर समझा क्या… अशा कॅप्शन ने राहुल गांधींचा एक फोटो ट्विट केला आहे.

    ज्यावर  महाराष्ट्र भाजपाने सडतोड उत्तर देत म्हटले की, ”खरं आहे, तुम्ही सावरकर होऊच शकत नाही! वीर सावरकर हे तेजस्वी, तपस्वी, स्वातंत्र्यवीर आणि युगपुरुष होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर उपाधी देशातील जनतेने दिली आहे. तुमच्या सारखं आडनाव चोरून ‘गांधी’ झाले नाहीत.’’

    राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी सोशलमीडियावर आपला टीआरपी घसरल्यानंतर नेहमीच सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्याचा आश्रय घेतला आहे. सावरकरांच्या या तथाकथित माफीनाम्यावर प्रख्यात इतिहासकारांनी अनेक स्पष्ट खुलासे करूनही राहुल गांधींनी त्याकडे हेतूतः दुर्लक्ष करत अनेकदा जुनीच टेप वाजवली आहे आणि राहुल गांधी ही टेप वाजवतात म्हणून काँग्रेसचे नेतेच मुद्दे रिपीट करत राहिले आहेत.

    They did not become Gandhi by stealing their last names like you BJPs counterattack on Rahul Gandhi on Congress comment on Savarkar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस