• Download App
    यांचा सिद्धू, त्यांचा सिद्धू!!, कोण, कोणी कोणाचे सिद्धू...!! |Their Sidhu, their Sidhu !!, who, whose Sidhu

    यांचा सिद्धू, त्यांचा सिद्धू!!, कोण, कोणी कोणाचे सिद्धू…!!

    नाशिक : पंजाब मध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथ झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू हे देशाच्या राजकारणात प्रचंड मोठे “ब्रँड” झाले आहेत. अर्थात या ब्रँडच्या अर्थ आणि वापर भारतातल्या राजकीय पक्षांचे नेते वेगवेगळ्या पद्धतीने करून घेताना दिसत आहेत.Their Sidhu, their Sidhu !!, who, whose Sidhu

    काँग्रेस सोडून इतर पक्षांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना “पक्षाचा विध्वंस करणारा ब्रँड” असे त्यांचे ब्रँडिंग करायला सुरुवात केली आहे. जे नेते आपल्या बेताल वक्तव्यांनी स्वतःच्याच पक्षाचे नुकसान करतात त्यांच्यावर त्यांचे विरोधक “सिद्धू” असल्याचा ठपका लावताना दिसतात. महाराष्ट्रात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांना शिवसेनेचे “सिद्धू” म्हणून घेतले आहे.



    संजय राऊत आपल्या वक्तव्यातून शिवसेनेचे नुकसान करत आहेत. शिवसेनेला त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दारात बांधून उभी केली आहे, असे आरोप अनेकदा झाले आहेत. त्यातूनच संजय राऊत यांचे “सिद्धू” नावाचे ब्रँडिंग नितेश राणे यांनी केले आहे.

    त्याचाही पुढे जाऊन आता देशाच्या राजकारणात तिसरा “सिद्धू” अवतरला आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी नुकत्याच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैया कुमारला “सिद्धू” नावाचा ठपका लावला आहे. कुमार याच्यावर तुकडे तुकडे गँगचा सदस्य असल्याचा आरोप भाजपचे नेते लावत असतात.

    त्यांच्यावर तोफ डागताना मी भाजपचे तुकडे-तुकडे करीन, असा दावा कन्हैया कुमार याने केला होता. त्यावर बोलताना शिवानंद तिवारी यांनी हा काय भाजपचे तुकडे तुकडे करणार? हा तर बिहार काँग्रेस मधला नवज्योत सिंग सिद्धू आहे. हा काँग्रेसचेच नुकसान करेल, अशी टीका केली आहे.

    वास्तविक काँग्रेस हा राष्ट्रीय जनता दलाचा मित्रपक्ष आहे. पण काँग्रेसला बिहारमध्ये आघाडीत घेतल्यामुळे आपले नुकसान झाल्याची भावना राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांमध्ये खोलवर रुजली आहे. त्यातून कन्हैया कुमारकडे राहुल गांधी हे बिहार प्रदेश काँग्रेसची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. म्हणूनच सुरुवातीपासून कन्हैया कुमार याच्यावर नवज्योत सिंग सिद्धू असल्याचा ठपका ठेवण्याची राजकीय मशक्कत राष्ट्रीय जनता दलाने सुरू केली आहे.

    एकूण नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या वक्तव्यातून आणि राजकीय कर्तृत्वातून देशाच्या राजकारणात आपण कसे “अँटी ब्रँड” ठरू शकतो याचे उदाहरणच घालून दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

    Their Sidhu, their Sidhu !!, who, whose Sidhu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस