‘’मला बाळासाहेब ठाकरेंची एक जयंती दाखवा, ज्यादिवशी सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींनी साधं ट्वीट तरी केलं आहे.’’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
‘’बाजारबुंडगे हे राऊत, दाऊद जे कोणी असतील त्यांना सांगू इच्छतो मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, तुमची…’’ असा इशाराही दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. या विरोधात आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. मुंबईतील सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. याचबरोबर आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही असं म्हणणारे परंतु काँग्रेसच्या मांडीला मांडी लावू अद्यापही बसलेल्या उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. Thean Uddhav Thackeray did the work of slapping sandal to Rahul Gandhis photo Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’दुर्दैवं एक अजून आहे, ते माफीवर म्हणत आहेत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचेही मित्र बसलेले आहेत. खरं म्हणजे ही इतकी शरमेची गोष्ट आहे, की रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस करतं, उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळी काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते, अशा प्रकारचा एक अंक काढला. पण हे त्याचा निषेध नाही करू शकले, खुर्ची महत्त्वाची होती. आताही काय, रोज सावरकरांचा अमपान झाल्यावर आम्हाला हे चालणार नाही, आम्हाला हे चालणार नाही, पण ते चालवताच आहे. जर तुमच्यात स्वाभिमान असेल तो स्वाभिमान तुमच्या कामात दिसला पाहिजे, तुमच्या कारवाईत, तुमच्या कृतीत दिसला पाहिजे. शब्दांमधला स्वाभिमान काही कामाचा नाही. तो बेगडी स्वाभिमान आहे, दुटप्पी स्वाभिमान आहे. खरा स्वाभिमान हा जर तुमच्या कृतीत असता तर त्या ज्याप्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यरला चपला मारल्या होत्या, तसंच राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं. पण खरी शिवसेना आमच्या सोबत आहे, बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहे, म्हणून राहुल गांधीला जोडे मारण्याचं काम देखील आम्हालाच करावं लागलं ते तुम्ही केलं नाही.’’
याचबरोबर, ‘’हे जे काही चाललं आहे, मला असं वाटतं की हे विसरले आहेत आपले विचार आहे. आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे. सरकारं येतील जातील, एखांद सरकार राहील, राहणार नाही. तुम्ही राजकीयदृष्ट्या युती कराल नाही कराल, तुम्हाला ज्यांच्यासोबत जायचं त्यांच्यासोबत जा. पण हे होत असताना सावरकरांचा अपमान जर तुम्ही सहन करत असाल, तर मला असं वाटतं की कुठंतरी तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. नुसतं तोंडाने बोलून चालणार नाही हिंमत दाखवा. ती हिंमत तुमच्यात नाही. मला एक बाळासाहेब ठाकरेंची जयंती दाखवा, ज्यादिवशी सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींनी साधं ट्वीट तरी केलं आहे. कधीच केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला ज्यांच्यासोबत जायचं त्यांच्यासोब जा, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, आम्ही भगवा सोडणार नाही.’’ असं यावेळी फडणवीस म्हणाले.
अरे वेड्यांनो सुर्याकडे पाहून थुंकाल तर थुंकी तुमच्या तोंडावर पडेल –
याशिवाय ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर केल्या जात असलेल्या टीकेवरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘’अलीकडच्या काळात बाजारबुंडगेही मोदींवर बोलतात, त्या बाजारबुंडग्यांना सांगू इच्छितो अरे वेड्यांनो सुर्याकडे पाहून थुंकाल तर थुंकी तुमच्या तोंडावर पडेल. त्यामुळे या बाजारबुंडग्यांना हे राऊत, दाऊद जे कोणी असतील त्यांना सांगू इच्छतो मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, तुमची थुंकी तुमच्याच चेहऱ्यावर पडते आहे आणि तो थुंकीने लदबदलेला तुमचा चेहरा पाहण्याची कुणाचीही इच्छा नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून हे जेवढ्यावेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतील, तेवढ्यावेळा भारतातील नागरिक पेटून उठेल आणि स्वातंत्र्यीवर सावरकर की जय असं म्हणत रस्त्यावर येईल आणि यांना यांची औकात दाखवून देईल, हा विश्वास मी व्यक् करतो.’’ असं फडणवीसांनी बोलून दाखवलं.
Thean Uddhav Thackeray did the work of slapping sandal to Rahul Gandhis photo Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा