प्रतिनिधी
मुंबई : “हर हर महादेव” या मराठीतील ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिला आहे. राज ठाकरे यांच्या दमदार आवाजाने सर्वांची मने जिंकली आहेत.The roar of Raj Thackeray’s voice is loud
राज ठाकरेंचे सिनेसृष्टीत पदार्पण!
”जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे … हर हर महादेव,” असा राज ठाकरे यांच्या दमदार आवाजातील डायलॉग ऐकायला मिळतोय. अभिजित देशपांडे लिखित- दिग्दर्शित “हर हर महादेव” हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित हा चित्रपट असणार आहे.
झी स्टुडिओजने नेहमीच दमदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. आता यामध्येच आता “हर हर महादेव” हे आणखी एक नाव सहभागी होणार आहे. राज्य सरकारने काही निवडक शहरांमध्ये चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. याच घोषणेचे औचित्य साधून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.
The roar of Raj Thackeray’s voice is loud
महत्त्वाच्या बातम्या
- OBC reservation : ओबीसी आरक्षण टाळण्यात राजकीय फायदा कोणाचा…?? आणि नुकसान कोणाचे…??
- रशियन फौजांच्या आक्रमणामुळे लाखांहून अधिक नागरिक जीव वाचविण्यासाठी युक्रेनमधून परागंदा
- रशियाची युक्रेनच्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक सुरु असल्याने युरोपमध्ये खळबळ
- बिबट्या घरात घुसून बसल्याने घबराट
- भागलपूर येथे शक्तिशाली स्फोटात सात जण ठार