• Download App
    हर हर महादेव : राज ठाकरेंच्या आवाजातली महागर्जना गाजतेय!! The roar of Raj Thackeray's voice is loud

    हर हर महादेव : राज ठाकरेंच्या आवाजातली महागर्जना गाजतेय!!

    प्रतिनिधी

    मुंबई : “हर हर महादेव” या मराठीतील ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिला आहे. राज ठाकरे यांच्या दमदार आवाजाने सर्वांची मने जिंकली आहेत.The roar of Raj Thackeray’s voice is loud

    राज ठाकरेंचे सिनेसृष्टीत पदार्पण!

    ”जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे … हर हर महादेव,” असा राज ठाकरे यांच्या दमदार आवाजातील डायलॉग ऐकायला मिळतोय. अभिजित देशपांडे लिखित- दिग्दर्शित “हर हर महादेव” हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित हा चित्रपट असणार आहे.


    शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर


    झी स्टुडिओजने नेहमीच दमदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. आता यामध्येच आता “हर हर महादेव” हे आणखी एक नाव सहभागी होणार आहे. राज्य सरकारने काही निवडक शहरांमध्ये चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. याच घोषणेचे औचित्य साधून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

    The roar of Raj Thackeray’s voice is loud

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : शिवसेना पक्षचिन्ह खटल्याची 30 जुलै रोजी सुनावणी; नेत्यांना माध्यमांत बोलण्यापासून रोखा, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाला फटकारले

    NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील केमिस्ट्रीच्या प्राध्यापकाला अटक; CBI ने मास्टरमाइंड म्हटले; कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न सांगितले

    प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यातल्या कार्यक्रमात चाव्यांचे वाटप