प्रतिनिधी
पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल.The responsibility will be decided after the investigation report of Urwade fire, informed Home Minister Dilip Walse Patil
चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, रुपाली चाकणकर, संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडून या दुर्देवी घटनेची माहिती घेतली.
वळसे पाटील म्हणाले, या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली असून आगीचे कारण,जबाबदार कोण याबाबतची कारवाई, अहवाल आल्या नंतर होईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत, यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात.
The responsibility will be decided after the investigation report of Urwade fire, informed Home Minister Dilip Walse Patil
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राच्या अखेरच्या नोटिसीवर ट्विटरने दिले उत्तर, म्हटले- आम्ही भारताप्रति प्रतिबद्ध, सरकारशी बोलणी सुरू
- मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर काँग्रेसचा उडाला गोंधळ; काही नेत्यांनी केले स्वागत, काही नेत्यांनी प्रश्न
- PM मोदींना भेटेले CM उद्धव ठाकरे, कोरोना संकटासह मराठा आरक्षणावर झाली चर्चा
- खानावळीच्या आचाऱ्यांकडून घरफोड्या; पुण्यातील खळबळजनक घटना उघड
- काशी, प्रयाग, हरिद्वार आणि गया येथे पोस्ट खाते करणार अस्थी विसर्जन ; गंगाजलही मिळणार