MP Sambhaji Raje : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडावर ६ डिसेंबर रोजी येणार आहेत. यासाठी आधी ते हेलिकॉप्टरने येणार होते, त्यासाठी होळीच्या माळावर हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार होती. परंतु अनेक शिवप्रेमींनी याला आक्षेप घेतल्याने त्यांनी रोपवेने येणार असल्याचे सांगितले आहे. ही माहिती खुद्द खा. संभाजीराजे यांनी दिली आहे. The President will come to Raigad by ropeway, not by helicopter; for respecting the feelings of devotees says MP Sambhaji Raje
प्रतिनिधी
मुंबई : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडावर ६ डिसेंबर रोजी येणार आहेत. यासाठी आधी ते हेलिकॉप्टरने येणार होते, त्यासाठी होळीच्या माळावर हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार होती. परंतु अनेक शिवप्रेमींनी याला आक्षेप घेतल्याने त्यांनी रोपवेने येणार असल्याचे सांगितले आहे. ही माहिती खुद्द खा. संभाजीराजे यांनी दिली आहे.
हेलिकॉप्टरला झाला विरोध
रायगडावर होळीचा माळ आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये होळीचा सण साजरा केल्याचे सांगितले जाते. 1996च्या आधीपर्यंत तिथे हेलिपॅड होते. परंतु बाजूलाच असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमुळे धूळ उडायची. यामुळे शिवप्रेमींनी विरोध करून तेथील हेलिपॅड काढायला लावला. आता राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही त्याच ठिकाणी हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू होते. परंतु याही वेळी शिवप्रेमींनी आक्षेप घेतला. यामुळे राष्ट्रपतींनी शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखत रोपवेने रायगडावर येणार असल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
याबाबत खा. संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती देत ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.”
तमाम मराठीजनांचा स्वाभिमान असलेल्या शिवरायांच्या दर्शनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येत असल्याने ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. दरम्यान, राष्ट्रपती खुद्द गडावर येणार असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पर्यटकांना दुर्गराज रायगडावर दि. ३ ते ७ डिसेंबर या काळात प्रवेश बंदीही करण्यात आली आहे.
The President will come to Raigad by ropeway, not by helicopter; for respecting the feelings of devotees says MP Sambhaji Raje
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा, हाती आले १३ रुपये, राजू शेट्टी म्हणतात- यातून सरकारचं तेरावं घालायचं का?
- आज मोदी, तर 16 डिसेंबरला राहुल गांधी उत्तराखंडच्या मोहिमेवर; 18 हजार कोटींच्या प्रकल्पांचा मोदींच्या हस्ते शिलान्यास
- कुसुमाग्रजांचे नाव दिले, पण सावरकरांचे नाव न देण्याचा देण्याचा अट्टाहासातून दोन्ही महनीयांची उंची कमी करत नाही का? फडणवीसांचा परखड सवाल
- IND V/s NZ : एजाज पटेलने पटकावल्या सर्व १० विकेट, कुंबळेची केली बरोबरी, भारताच्या सिराजनेही किवी सलामीविरांना धाडले माघारी
- मोठी बातमी : परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार, महानिर्मितीने काढली निविदा, पाशा पटेल यांच्या पाठपुराव्याला यश