• Download App
    या राज्याचे नाव आहे गोवा, कॉँग्रेसचा चालणार नाही दावा, रामदास आठवले यांनी साधला काव्यमय निशाणा|The name of this state is Goa, Congress will not run, claims Ramdas Athavale

    या राज्याचे नाव आहे गोवा, कॉँग्रेसचा चालणार नाही दावा, रामदास आठवले यांनी साधला काव्यमय निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : या राज्याचे नाव आहे गोवा, लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा येथे घडणार आहे इतिहास नवा, काँग्रेसचा चालणार नाही दावा अशा काव्यमय शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.The name of this state is Goa, Congress will not run, claims Ramdas Athavale

    जनता काँग्रेसकडे पर्याय म्हणून पहात आहेत. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत किमान २४ ते २६ जिंकणार असा विश्वास असल्याचे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला होता. त्याला रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे.



    गोवा विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी वाढत चालली आहे. एका सर्व्हेक्षणानुसार गोव्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. गोव्यातील लढत अटी-तटीची होईल, असे म्हटले आहे. गोवा विधनसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. गोव्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे ३० टक्के मते मिळतील, तर काँग्रेस आणि आप पक्षाला प्रत्येकी २४ टक्के मते मिळतील. एमजीपी आणि मित्रपक्षाला ८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. अन्य पक्षांना १४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

    मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून गोव्यातील लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. जानेवारीत प्रमोद सावंत यांना ३३.५ टक्के, तर फेब्रुवारीत ३०.४ टक्के गोवेकरांनी पसंती दिली. त्याखालोखाल आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर यांना जानेवारीत १८.९ टक्के, तर फेब्रुवारीत १९.५ टक्के, भाजपचे उमेदवार असलेल्या विश्वजीत राणे यांना जानेवारीत १५.५ टक्के आणि फेब्रुवारीत १४.५ आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना जानेवारीत ८.६ टक्के तर फेब्रुवारीत ७.८ टक्के गोवेकरांनी पसंती दर्शवली.

    सर्व्हेमध्ये भाजपला ४० पैकी १४ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १० ते १४ जागा मिळू शकतात. त्याशिवाय आम आदमी पक्षाला ४ ते ८ जागा मिळू शकतात. एमजीपीला ३ ते ७ जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य अथवा अपक्षांना ० ते २ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    गोव्यात ४० जागांच्या विधानसभेसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच ४० जागांसाठी तब्बल ३०१ जण राहिले असून प्रथमच उमेदवारांची संख्या विक्रमी आहे. भाजपने सर्व ४० मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती असून काँग्रेसने ३७ तर गोवा फॉरवर्डने ३ उमेदवार दिले आहेत.

    आम आदमी पक्षाने ३९ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. मगोप-तृणमूल युतीनेही ३९ उमेदवार दिले आहेत. युवावर्गाच्या पाठिंब्यावर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष प्रथमच रिंगणात आहे. या पक्षाने ३८ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी युतीने २३ तर अन्य लहान पक्षांनी १० मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार दिलेले आहेत.

    The name of this state is Goa, Congress will not run, claims Ramdas Athavale

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस