न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर शेलार यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.The High Court on Thursday issued notice to the mayor on a petition filed by MLA Ashish Shelar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात वक्तव्य केल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप आमदार आशीष शेलार यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी महापौरांना नोटीस बजावली.
भाजप आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खानला अटक
न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर शेलार यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.तसेच पुढील सुनावणीपर्यंत शेलार यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल केले जाणार नसल्याची हमी पोलिसांतर्फे न्यायालयाला देण्यात आली.
नोटीसमध्ये काय म्हटले आहे
नोटीस मध्ये दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.त्याचवेळी याचिकाकर्ते आणि प्रतिवादी हे लोकप्रतिनिधी असून जबाबदारीच्या पदांवर आहेत.त्यामुळे त्यांनी हा मुद्दा परस्पर सामंजस्याने सोडवावा आणि शब्दही जपून वापरावेत, अशी तोंडी सूचना न्यायालयाने केली.
नेमक प्रकरण काय आहे
मुंबईच्या वरळी बीडीडी चाळ येथे नोव्हेंबरमध्ये सिलिंडर स्फोट होऊन 4 जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार करताना हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले.या घटनेतील तिघांचा मृत्यू झाला असून पाच वर्षाचा एक मुलगा जिवंत आहे.यावेळी डॉक्टर आणि नर्सचे निलंबन करण्यात आले आहे.
जखमींना पाहण्यासाठी मुंबईच्या महापौर 72 तासांनी पोहोचल्याने भाजपने यावर टीका केली होती. याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर टीका केली होती. टीका करताना महापौरांबाबत शेलार यांनी काही आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे.
The High Court on Thursday issued notice to the mayor on a petition filed by MLA Ashish Shelar
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : संजय राऊत यांचा मोठा दावा, आणखी 10 मंत्री देणार राजीनामे, निवडणुकीची दिशा बदलली!
- बंगालमध्ये वाढत्या कोरोनावर उच्च न्यायालयाची कठोर भूमिका, निवडणूक आयोगाला पालिका निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश
- Corona Update : कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये ६.७ टक्क्यांनी वाढ, गेल्या २४ तासांत २ लाख ६४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद