• Download App
    सरकारने आता एकतरी काम पारदर्शकपणे करून दाखवावे ; बच्चू कडूंचा महाविकास आघाडी सरकारला टोलाThe government should now do one thing transparently; Bachchu Kadu's Mahavikas Aghadi slammed the government

    सरकारने आता एकतरी काम पारदर्शकपणे करून दाखवावे ; बच्चू कडूंचा महाविकास आघाडी सरकारला टोला

    मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ उडाला आहे.The government should now do one thing transparently; Bachchu Kadu’s Mahavikas Aghadi slammed the government


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून राज्य सरकारला टोला लगावला आहे.’आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावे,’ असे कडू यांनी म्हंटले आहे.

    बच्चू कडू यांनी अमरावती येथे आज माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आरोग्य विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी केली आहे.



    मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ उडाला आहे.

    आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागलेले आहे.एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र दिल्याचं समोर येतंय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरीही न्यासा कंपनीला पुन्हा परीक्षेचं काम दिल्याची खंत आहे. ज्या कंपनीने घोळ केला तरी त्यांना काम द्यायचं कारण काय? त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, असेही बच्चू कडू यांनी यावेळी म्हंटले आहे.

    The government should now do one thing transparently; Bachchu Kadu’s Mahavikas Aghadi slammed the government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??