• Download App
    महाराष्ट्रात साकारला सिलिकॉनचा पहिला पुतळा, जिवंत माणसासारखा हुबेहूब; सांगलीत वडिलांच्या स्मरणार्थ मुलाने बनवला|The first silicone statue in Maharashtra, Like a living man; made by the son in Sangli for memory of his father

    महाराष्ट्रात साकारला सिलिकॉनचा पहिला पुतळा, जिवंत माणसासारखा हुबेहूब; सांगलीत वडिलांच्या स्मरणार्थ मुलाने बनवला

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : सांगली जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सिलिकॉनचा पुतळा बनवला आहे. विशेष म्हणजे हा पुतळा जिवंत माणसासारखा हुबेहूब दिसतो. महाराष्ट्रातील सिलिकॉनचा हा पहिला पुतळा ठरला आहे.The first silicone statue in Maharashtra, Like a living man; made by the son in Sangli for memory of his father

    सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्य उत्पादन शुल्क विभागचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांचा हा पुतळा आहे. त्यांचे मागील वर्षी ऑन ड्युटीवर असताना कोरोनाने निधन झाले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कोळी समाजाचे नेते होते. त्यांनी अनेक तरुणांना नवीन उद्योग सुरू करण्यात सहकार्य आणि मार्गदर्शनही केले होते.



    वडिलांची पोकळी भरून काढण्यासाठी मुलगा अरुणला सिलिकॉनच्या पुतळ्याची संकल्पना सुचली.सिलिकॉनला कलर इफेक्ट राहतो. त्याचे लाईफ तीस वर्ष असते. दररोज पुतळ्याचे कपडे बदलता येतात. दररोज हेअर स्टाईल चेंज करता येते. सर्व सामान्य माणसा सारखाच हा पुतळा दिसतो.

    त्वचा, रंग, रूप, केस, भुवया, चेहरा, डोळे आणि शरीराचे अवयव हे जिवंत माणसा सारखे हुबेहूब दिसतात.समोर असणारा हा पुतळा आहे की जिवंत व्यक्ती ? असा प्रश्न बघणाऱ्या व्यक्तीला पडतो. बंगळूरमधील श्रीधर मूर्ती यांनी तब्बल पाच महिने परिश्रम घेऊन हा पुतळा तयार केला आहे.

    The first silicone statue in Maharashtra, Like a living man; made by the son in Sangli for memory of his father

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस