• Download App
    ४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पहिली बैलगाडा शर्यत सांगलीत होणारThe first bullock cart race in Maharashtra will be held on January 4 in Sangli

    ४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पहिली बैलगाडा शर्यत सांगलीत होणार

    सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावी ४ जानेवारी २०२२ ला दुपारी १ वाजता बैलगाडी शर्यत होणार आहे.The first bullock cart race in Maharashtra will be held on January 4 in Sangli


    विशेष प्रतिनिधी

    सांगली : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर १६ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात पहिलीच परवानगी सांगली जिल्ह्यात मिळाली आहे.

    सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावी ४ जानेवारी २०२२ ला दुपारी १ वाजता बैलगाडी शर्यत होणार आहे.या शर्यतीसाठी २६ नियम देण्यात आलेत. नियमांआधारेच ही स्पर्धा घेतली जाणार आहेसांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून बैलगाडी शर्यत भरवण्याचे दिले परवानगी पत्र दिले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



    संदीप गिड्डे यांच्या पुढकारातून ही बैलगाडा शर्यत आयोजीत करण्यात आली आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात पहिलीच परवानगी सांगली जिल्ह्यात मिळाली आहे. त्यामुळे मी जिल्हा प्रशासनाचे आभार मानत असल्याचे संदीप गिड्डे यांनी सांगितले.आम्ही सर्व कोरोनाचे नियम पाळून ही शर्यत घेणार आहोत.ही परवानगी दिल्यामुले प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि सुप्रीम कोर्टाचेही गिड्डे यांनी आभार मानले.

    The first bullock cart race in Maharashtra will be held on January 4 in Sangli

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप