विशेष प्रतिनिधी
मुंबई : आधी भांड भांड भांडले आता प्रोटोकॉलच्या आड दडले; चिपी विमानतळ उद्घाटनावरून शिवसेना आणि नारायण राणे एक – एक पाऊल मागे घेतले. कोकणातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या विमानतळाच्या श्रेयावरुन राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. तसेच उद्घाटनाला कोण उपस्थित राहणार यावरुनही चांगलीच चर्चा रंगली आहे. The earlier quarrelsome quarrels now hid behind the protocol; Shiv Sena – Rane’s one step back from the inauguration of Chippewa Airport
उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर आम्ही प्रोटोकॉलनुसार मान देऊ, असे सांगत वादातून माघार घेतली आहे.
- नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात पुणे पोलिसांची लुकआऊट नोटीस ; कर्जफेड केली नसल्याने बजावली
काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत उदघाटनाची बदलेली तारीख जाहीर करत सेनेने ७ ऑक्टोबर जाहीर केलेली तारीख रद्द करून ती ९ ऑक्टोबर असल्याचे सांगितले होते. तसेच उदघाटनाला केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार आहेत, मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असेही म्हणाले.
त्यानंतर शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातच पत्रकार परिषद घेऊन ‘२२ वर्षे राणेंनी विमानतळासाठी काहीच केले नाही, मागील ६ वर्षांत शिवसेनेने अथक प्रयत्न करून विमानतळ उभे केले, हे विमानतळ महाराष्ट्राच्या मालकीचे, राणेंनी श्रेय लाटू नये’, असे सुनावले. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही, ‘विमानतळ महाराष्ट्राच्या मालकीचे आहे, उदघाटनाची कार्यक्रमात आम्ही यजमान आहोत, केंद्रीय उड्डयनमंत्री सिंधिया आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत आहे’, असे म्हणाले. त्यानंतर नारायण राणे यांनी वादातून माघार घेतली आहे.
याचा अर्थच शिवसेना नेते आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर वार – प्रहार करून राजकारण साधून घेतले आणि विमानतळाच्या उद्घाटनात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांना टाळताच येणार नाही, असे समजल्यावर एक प्रकारे प्रोटोकॉलच्या आड दडून माघार घेऊन बसलेत.
The earlier quarrelsome quarrels now hid behind the protocol; Shiv Sena – Rane’s one step back from the inauguration of Chippewa Airport
महत्त्वाच्या बातम्या
- देशात आयआयटी मद्रास पहिल्या क्रमांकावर, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मानांक यादी जाहीर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर चर्चा
- मागास उत्तर प्रदेशचा प्रगत केरळ, महाराष्ट्राला धडा, ३३ जिल्हे कोरोनामुक्त, गेल्या २४ तासांत केवळ १० नवे रुग्ण
- चंद्रयान -२ उपकरणांनी नोंदविली महत्वपूर्ण निरीक्षणे, त्यावरून चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोक्सिल व पाण्याचा बर्फ,क्रोमियम व मँगनीजही सापडले