विशेष प्रतिनिधी
मुंबई : आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते असे सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झाली आहे, असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावले आहेत.The condition of the Congress like a landlord who has nothing now, Sharad Pawar’s stone talk
एका न्यूजपोर्टलशी बोलताना काँग्रेसच्या नेतेमंडळीमध्ये अजून अहंकाराची भावना आहे का? या प्रश्नावर पवारांनी उदाहरण देत सांगितलं की, मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे.
पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवे पिक दिसते तेव्हा तो हे सर्व हिरवे पिक माझे होते असे सांगतो. तेसच कॉँग्रेसची अवस्था झाली आहे.
काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? यावर पवार म्हणाले, तितकं काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. होती हे मान्य केलं पाहिजे. आता नाही हे मान्य केले तर मग विरोधी पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल.
पवार म्हणाले, काँग्रेसची आज दूरवस्था झाली आहे. असे असले तरी हा आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेत.
काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.
The condition of the Congress like a landlord who has nothing now, Sharad Pawar’s stone talk
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाग्रस्त, पूरग्रस्तांच्या मदतनिधीतील पैैसा खाल्ला, पत्रकार राणा अयूब यांच्यावर गुन्हा दाखल
- सर्वाच्च न्यायालयाकडून नियुक्त समितीचा अहवाल शेतकऱ्यांच्या बाजुने, समिती सदस्य अनिल घनवट यांची अहवाल जाहीर करण्याची मागणी
- शरद पवारांचा टोमणा : जमीनदारांसारखी काँग्रेसची अवस्था, जो हवेली वाचवू शकला नाही, पक्ष काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत टिकला नाही
- राहूल गांधींनी कटरा ते वैैष्णोदेवी १४ किलोमीटर केला पायी प्रवास, राजकीय वक्तव्य करण्यास दिला नकार