• Download App
    ठाकरे ब्रदर्स म्हणतात 'थँक्यू मोदी' : उद्धव ठाकरे पाठोपाठ राज ठाकरे यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार ! Thakre brothers says thank you Modi : Raj Thakreys twitt after prime minister given permission to produce corona vaccine in mumbai Haffkine Institute

    ठाकरे ब्रदर्स म्हणतात ‘थँक्यू मोदी’ : उद्धव ठाकरे पाठोपाठ राज ठाकरे यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.Thakrey brothers says thank you Modi : Raj Thakreys twitt after prime minister given permission to produce corona vaccine in mumbai Haffkine Institute

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लसीची संख्या वाढवण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूमध्ये निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधानांनी त्याला परवानगी दिली आहे. याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. या महामारीत केंद्राकडून असाच पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

     

    केंद्र सरकारकडून असेच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

    केंद्र सरकारकडून मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मितीस परवानगी

    केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.

    केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. केंद्राच्या या परवानगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

    Thakre brothers says thank you Modi : Raj Thakreys twitt after prime minister given permission to produce corona vaccine in mumbai Haffkine Institute

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!