• Download App
    विधानसभा अध्यक्षांच्या "आवाजी" निवडणुकीसाठी ठाकरे - पवारांची लगीन घाई; विधीमंडळातच बोलवली कॅबिनेट बैठक!! । Thackeray-Pawar rush to elect Assembly Speaker's "voice"; Cabinet meeting called in the legislature !!

    विधानसभा अध्यक्षांच्या “आवाजी” निवडणुकीसाठी ठाकरे – पवारांची लगीन घाई; विधीमंडळातच बोलवली कॅबिनेट बैठक!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन संपायला आता फक्त एकच दिवस उरला असताना अजूनही महाविकास आघाडीने ठरविलेल्या नुसार विधानसभा अध्यक्षांची आवाजी मतदानाने निवडणूक झालेली नाही. त्यामुळे आघाडी सरकार अत्यंत अस्वस्थ झाले असून राज्यपालांवर दबाव वाढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात आज दुपारी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. Thackeray-Pawar rush to elect Assembly Speaker’s “voice”; Cabinet meeting called in the legislature !!

    या कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा एकदा आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा ठराव मंजूर करण्यात येईल तसेच ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यायची नाही याबाबतचा ठराव मंजूर करण्यात येईल आणि हे दोन्ही ठराव राज्यपालांकडे तातडीने मंजुरीसाठी पाठवले जातील.



    राज्यपालांनी आधीच विधानसभा अध्यक्षांच्या आवाजी मतदानाचा निवडणुकीवर आपला निर्णय राखून ठेवला आहे. काल ठाकरे – पवार सरकारचे तीन मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन राज्यपालांना भेटले होते. परंतु त्यांनी घटना तज्ञांशी चर्चा करून निर्णय कळवतो असे सांगितले आहे. तो निर्णय अद्याप राज्यपालांनी कळवलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लटकलेली आहे.

    आज दुपारी विधीमंडळ परिसरात कॅबिनेटची बैठक घेऊन त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने करण्यासंबंधीचा ठराव आणि ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यायची नाही असा ठराव मंजूर करण्यात येतील आणि ते तातडीने राज्यपालांकडे पाठवण्यात येतील. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने मधला मार्ग म्हणून राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी देखील चर्चा केली आहे. कदाचित त्यांनीच कॅबिनेट बैठकीचा मार्ग सुचवला असेल आणि ही तातडीची ठाकरे पवार कॅबिनेटची बैठक आज दुपारी बोलावली गेली आहे.

    Thackeray-Pawar rush to elect Assembly Speaker’s “voice”; Cabinet meeting called in the legislature !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस