Friday, 9 May 2025
  • Download App
    राज्यपालांचे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले; ठाकरे - पवार सरकारची 30 जूनला विधानसभेत अग्निपरीक्षा!! Thackeray Pawar government will have to prove majority in vidhan sabha on 30 th june

    राज्यपालांचे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले; ठाकरे – पवार सरकारची 30 जूनला विधानसभेत अग्निपरीक्षा!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आठ दिवसांनी ठाकरे – पवार सरकारला लागलेल्या घरघरीचा अंतिम क्षणाचा आलेला आहे. 30 जूनला विधानसभेत ठाकरे – पवार सरकारने आपले बहुमत सिद्ध करावे, असे आदेश राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी आज रात्री दिले आहेत. हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधिमंडळ सचिवालय आला पोचले असून याबाबत मुख्यमंत्री उच्च सह्याद्री आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Thackeray Pawar government will have to prove majority in vidhan sabha on 30 th june

    सुमारे सहा मुद्द्यांचे आदेश भगतसिंह कोशियारी यांनी ठाकरे – पवार सरकारला आणि विधिमंडळ सचिवालयाला पाठविले आहे. ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे स्पष्ट दिसत असताना सरकारने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करावे. त्याचबरोबर सर्व सदस्यांच्या सदनातील आणि सदनाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सरकारने चोख पार पाडावी आणि 30 जून रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अधिवेशन चालवून आपले बहुमत सिद्ध करावे, असे आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.



    – अमित शहा, नड्ड्यांच्या भेटीनंतर फडणवीस राजभवनात

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवसभर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ते मुंबईत परतले. त्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची काल रात्री भेट घेतली आणि ठाकरे सरकारने बहुमत गमावले असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

    – शिंदे गटाने पाठिंबा काढला

    एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्या आधारेच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने बहुमत गमावले आहे, असा दावा करून सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली. ती राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी तात्काळ मान्य करून ठाकरे सरकारला विधानसभा सदनात 30 जून रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला आणि विधान भवन सचिवालयाला पोहोचले आहे याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Thackeray Pawar government will have to prove majority in vidhan sabha on 30 th june

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस