प्रतिनिधी
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019-2020 मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात बनावट प्रमाणपत्रे तयार करून नोकऱ्या मिळवणाऱ्या 293 शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले, तर 7880 उमेदवारांना पुढील काळात टीईटीसाठी कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात आले आहे.TET malpractice case 293 teachers sacked, 7880 permanently disqualified
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बुधवारी हा निर्णय घेतला.
या परीक्षेत १६,७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ७,८८० उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. २९३ उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती, उर्वरित ८७ उमेदवार आरोपींच्या संपर्कात होते. परिषदेने बुधवारी ४८० पानी पत्रक जाहीर करून गैरव्यवहार करणाऱ्या ७८८० उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे.
गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांच्या नियुक्त्या झाल्या असतील तर त्यांची सेवा तात्काळ संपवण्यात यावी आणि त्याची नोंद नियुक्त्या झालेल्या विभागांनी घ्यावी, असा आदेश या देण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर स्टेशन पुणे शहर येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला ४० हून जास्त आरोपींना अटक झाली होती.
TET malpractice case 293 teachers sacked, 7880 permanently disqualified
महत्वाच्या बातम्या
- पोस्टाची अनोखी योजना : अवघ्या १० रुपयांच्या वॉटरप्रूफ लिफाफ्यात लाडक्या भावाला पाठवा राखी!!
- अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठात सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यासक्रम; पाकिस्तानी आणि इजिप्शियन लेखकांची पाठ्यपुस्तके हटविण्यावरही मंथन!!
- टेम्पल रनच्या पलिकडे : राहुल गांधींनी लिंगायत धर्मगुरूंकडून घेतली लिंगदीक्षा, बांधले इष्टलिंग!!; राजकीय अर्थ काय??
- ठाकरे – पवारांना शिंदे – फडणवीस सरकारचा पुन्हा दणका; वॉर्ड पुनर्रचना रद्द!! 2017 नुसारच सर्व महापालिका निवडणूका!!