Sunday, 11 May 2025
  • Download App
    भाजपने राज्यभर आंदोलन करुनही मंदिरे न उघडण्याच्या भूमीकेवर ठाकरे सरकार ठाम Tempels will not opens clears state govt.

    भाजपने राज्यभर आंदोलन करुनही मंदिरे न उघडण्याच्या भूमीकेवर ठाकरे सरकार ठाम

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोनाची तिसरी लाट, संभाव्य परिणाम आणि केंद्र सरकारच्या नव्या सूचनांकडे बोट दाखवून मंदिरे बंदच राहतील, असे महाराष्ट्र सरकारने पुन्हा सांगितले आहे. Tempels will not opens clears state govt.

    संभाव्य धोक्याचा इशारा पाहता विशेषतः धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही विचार नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
    कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने मंदिरे सुरू करा, अशी मागणी लावून धरत या मुद्यावरून आणखी आक्रमक होण्याचा इशारा भाजपने दिला आहे.



    तरीही मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने काळजी घेण्यास सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. तसेच, रुग्ण वाढल्यास नव्याने काही निर्बंध लादण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार दिला आहे. त्यामुळे मंदिरप्रश्नी सरकार ठाम आणि विरोधक आक्रमक झाल्याने संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

    Tempels will not opens clears state govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : ज्यावेळी अमेरिका आणि चीन उतरले पाकिस्तानच्या बचावात, त्याचवेळी काँग्रेस आणि विरोधक मोदी सरकारला घेरायच्या बेतात!!

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!