विशेष प्रतिनिधी
मुंबई – पावसाचा जोर ओसरला असून, राज्याच्या बहुतांश भागांत दिवसभर निरभ्र आकाशदर्शन होत आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून, नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुंबई शहराच्या कमाल तापमानाची वाटचाल आता ३५ अंश सेल्सिअसकडे सुरू झाली आहे.Temp rises in all over maharashtra
शहरात गेल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर नसला तरी वातावरणात गारवा तयार झाला होता. शनिवार आणि रविवारी मुंबईतील कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. त्यात आता चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते ३५ अंश सेल्सिअसकडे झेपावताना दिसते. हवेतील आर्द्रतेमध्येही वाढ झाली आहे. कुलाबा ८८ टक्के, तर सांताक्रुझ ८६ टक्के आर्द्रतेची नोंद झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील वातावरणात बदल झाले आहेत. सांताक्रुझ येथील केंद्रांवर ३३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस होते. पाऊस थांबल्याने आकाश निरभ्र झाले. त्यामुळे वातावरणातील उष्मा वाढत आहे.
Temp rises in all over maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- नवीन पेन्शन स्किममध्ये कर्मचाऱ्यांना होणार फायदा, कंपन्यांना वाढवावे लागणार योगदान
- तिरूपती मंदिरातील हारांच्या फुलांपासून होणार उदबत्तीची निर्मिती, देशात घरोघरी पसरणार सुगंध
- दोन पुत्रांच्या संघर्षात लालूंची साथ तेजस्वीलाच, मोठ्या मुलाला भेटही नाकारली
- गरीबांसाठी आरक्षणाचे लाभ सोडून द्या, भाजप आमदाराची मुख्यमंत्री नितीशकुमारांकडे मागणी
- शेतकऱ्यांना यंदा उस लागणार आणखी गोड, उसाला मिळणार प्रतिक्विंटल २९० रुपये एफआरपी