• Download App
    ‘खोटं बोल पण रेटून बोल, ‘संजय राऊतांना अल्झायमर झालाय, त्यांना सकाळचं दुपारी आठवत नाही’, चंद्रकांत पाटलांचा टोला‘Tell a lie but retweet,‘ Sanjay Raut has Alzheimer’s, he doesn’t remember the morning and afternoon ’, Chandrakant Patil’s 

    ‘खोटं बोल पण रेटून बोल, ‘संजय राऊतांना अल्झायमर झालाय, त्यांना सकाळचं दुपारी आठवत नाही’, चंद्रकांत पाटलांचा टोला

    ‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही काय बोलेत. ‘Tell a lie but retweet,‘ Sanjay Raut has Alzheimer’s, he doesn’t remember the morning and afternoon ’, Chandrakant Patil’s 


    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  संजय राऊत यांच्या कोथळा काढण्याच्या वक्तव्यावरुनही पाटील यांनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय. ‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही काय बोलेत.

    ते सरळ सरळ अस म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो. ते पोलीस बघतील. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे’,असं पाटील म्हणाले.

    बेळगाव महापालिका निवडणुकीतील विजयानंतर पाटील यांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय.



    सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केलं जात आहे की बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना विचारलं असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत.

    पाटलांनी शिवसेनेला थेट आव्हानच दिल आहे की,हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार.

    तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.

    राऊतांना पाटलांचा पलटवार

    एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

    ‘ज्या ज्या वेळेला रिझल्ट चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे’, असा टोला पाटील यांनी लगावलाय.

    ‘Tell a lie but retweet,‘ Sanjay Raut has Alzheimer’s, he doesn’t remember the morning and afternoon ’, Chandrakant Patil’s

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!