• Download App
    टाटा कंपनीचे १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क; महामार्गावर सुद्धा योजना। Tata group tata power reach networks more than 1000 electric vehicle ev charging stations in country

    टाटा कंपनीचे १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क; महामार्गावर सुद्धा योजना

    वृत्तसंस्था

    मुंबई : देशातील आघाडीची वाहनिर्मिती कंपनी टाटा मोटर्सने देशातील १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क उभारले असून महामार्गावर दहा हजार स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. Tata group tata power reach networks more than 1000 electric vehicle ev charging stations in country

    आगामी युग हे इलेक्ट्रिक मोटारीचे, वाहनांचे आहे. त्यामुळे टाटा कंपनीने आतापासून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चलना दिली आहे.विशेष म्हणजे टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. तसेच आगामी काही वर्षात आणखी १० इलेक्ट्रिक कार सादर करण्याचा मानस कंपनीचा आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने देशभरात १ हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे (EV) चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारले आहेत.

    देशभरात १००० सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क ऑफिसेस, मॉल्स, हॉटेल्स, रिटेल आउटलेट्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टाटा पॉवरच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि अखंडित ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे.

    टाटा पॉवर ईझेड चार्जर्सच्या इकोसिस्टिममध्ये सार्वजनिक चार्जर्स, कॅप्टिव्ह चार्जर्स, बसेस/ताफ्यांसाठी चार्जर्स आणि घरगुती चार्जर्स यांच्या संपूर्ण मूल्य शृंखलेचा समावेश आहे. देशभरातील सर्व महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.
    पहिले चार्जर्स मुंबईमध्ये इन्स्टॉल केले गेले होते आणि आता देशभरात जवळपास १८० शहरांमध्ये आणि अनेक राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्समध्ये आणि विविध बाजारपेठ विभागांमध्ये टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स उभारले आहेत.

    इलेक्ट्रिक गाड्या वापरणारे लोक आपल्या गाड्या अगदी सहज व अतिशय सुविधाजनक पद्धतीने चार्ज करू शकतात. सार्वजनिक क्षेत्रात १ हजारांहून जास्त EV चार्जिंग पॉईंट्स उभारून देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती आणण्याच्या वाटचालीतील योगदान दिले आहे.

    Tata group tata power reach networks more than 1000 electric vehicle ev charging stations in country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा