• Download App
    नवाब मलिक यांनी साधला निशाणा ; म्हणाले - ' चंद्रकांत पाटील यांची जीभ घासरली होती आता पाय घसरू नये' Targeted by Nawab Malik; Said - 'Chandrakant Patil's tongue had slipped, now his feet should not slip'

    नवाब मलिक यांनी साधला निशाणा ; म्हणाले – ‘ चंद्रकांत पाटील यांची जीभ घासरली होती आता पाय घसरू नये’

    राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय.Targeted by Nawab Malik; Said – ‘Chandrakant Patil’s tongue had slipped, now his feet should not slip’


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय.

    दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावलाय. ‘ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी, असं मलिक म्हणाले.



    नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

    सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याविषयी एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं.

    दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की,देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. तसेच सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी काय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं देखील पाटील म्हणाले होते.

    Targeted by Nawab Malik; Said – ‘Chandrakant Patil’s tongue had slipped, now his feet should not slip’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस