विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपळे गुरव येथील जलतरण तलाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठी २ फेब्रुवारीपासून खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर ५ फेब्रुवारीपासून ५० टक्के क्षमतेने सर्वांसाठी हा जलतरण तलाव खुला करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक क्रीडा आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली.Swimming pool at Pimple Gurav open to all from 5th February
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चालविण्यात येणारे सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते. राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जलतरण तलाव सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार महानगरपालिकेचा पिंपळे गुरव जलतरण तलाव ५० टक्के क्षमतेने सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. जलतरण तलावावर कोरोनाचे सर्व नियम पाळून तसेच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत याची खात्री करूनच प्रवेश देण्यात येईल, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
Swimming pool at Pimple Gurav open to all from 5th February
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान आज करणार समाज सुधारक रामानुजाचार्य पुतळ्याचे अनावरण
- मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकरला अटक
- पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या व्हायच्या गुप्त बैठका, देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचाच धक्कादायक खुलासा
- आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण